Goldman Sachs Bank : ‘तिसरी मुंबई’तून आर्थिक विकासाचा नवा अध्याय : मुख्यमंत्री

Goldman Sachs Bank

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरक्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत आहे. ही  आर्थिक विकासाचा नवा अध्याय असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१८ ऑगस्ट) व्यक्त केला. (Goldman Sachs Bank)

गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या वरळी येथे नव्या, विस्तारित मुंबई कार्यालयाचे उदघाटन झाले. त्यावेळी गुंतवणूकदारांशी चर्चा करताना ते बोलत होते.

मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून  फडणवीस म्हणाले की, गोल्डमन सॅक्ससारख्या जागतिक वित्तसंस्थेचे नवे कार्यालय महाराष्ट्रात उघडले जाणे ही राज्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे  कुशल मनुष्यबळ, भक्कम बाजारपेठा आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरणाची पुष्टी होते. ही घटना महाराष्ट्राचे आर्थिक क्षेत्रातील नेतृत्व अधोरेखित करणारी आहे. खासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून ‘तिसरी मुंबई’ घडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. तिसऱ्या मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची केंद्र उभारण्यात येत आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची उभारली जाणार आहे. या ठिकाणी इनोवेशन हब उभारले जाणार आहे. त्यामध्ये संशोधनासाठीच्या सर्व सुविधा असतील. तसेच क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रातील संशोधनाचीही सोय असेल. एआय आधारीत व्यवस्था आणि संशोधन ही असेल. (Goldman Sachs Bank)

तिसरी मुंबईची सध्याच्या मुंबईसोबत कनेक्टिव्हिटी उत्तम असेल. कोस्टल रोड, अटल सेतू सोबतच सध्या काम सुरू असलेला वरळी – शिवडी लिंक रोडही असेल. मुंबईच्या विकासाला आणखी चालना देण्याचे काम ही तिसरी मुंबई करेल. या क्षेत्राच्या विकासामध्ये खासगी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. (Goldman Sachs Bank)

गोल्डमन सॅक्सचे अध्यक्ष केविन स्नेडर म्हणाले की, मुंबईतील हे नवे कार्यालय भारतात आमच्या दशकांतील वाढीचा पुढचा टप्पा आहे. भारतातील बाजारपेठेतील संधी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

गोल्डमन सॅक्सची भारतातली कामगिरी

२०२१ पासून भारतात गुंतवणूक बँक म्हणून मान्यता. २०२४ पासून आयपीओ आणि ब्लॉक ट्रेड्सद्वारे दहा अब्ज डॉलरहून अधिक निधी उभारणारे प्रकल्प पूर्ण. यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या आयपीओ आणि ब्लॉक ट्रेडचा समावेश. २००६ पासून भारतात 8.5 अब्ज डॉलरहून अधिक भांडवली गुंतवणूक. सध्या कंपनी भारतात गुंतवणूक बँकिंग, इक्विटी विक्री आणि ट्रेडिंग, फिक्स्ड इनकम सिक्युरिटीज, अ‍ॅसेट मॅनेजमेंट आणि संशोधन अशा विविध सेवा पुरवते.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर