Gokul: ‘गोकुळ’मध्ये मुख्यमंत्री लक्ष घालतील असे वाटत नाही

SATEJ PATIL

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ अध्यक्षपदाच्या घडामोडीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे, असे मला वाटत नाही, असे मत परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी व्यक्त केले. अरुण डोंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याची वेळ येणार नाही. सामंजस्याने हा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Gokul)

पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती. गोकुळमध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र असलो तरी आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. त्यामुळे सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते. फॉर्म्युल्यानुसार अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा होती. सामंजस्याने हा प्रश्न सुटेल.

ते म्हणाले, गोकुळ अध्यक्षपदाच्या घडामोडीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे, असे मला वाटत नाही. हे जिल्ह्याचे राजकारण आहे. फॉर्म्युल्यानुसार विश्वास नारायण पाटील आणि अरुण डोंगळे यांना प्रत्येकी  दोन वर्षे अध्यक्षपद देण्याचे ठरले होते. १५ मे पर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा होती, अजूनही आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती,  गोकुळमध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र आहोत. मात्र आजरा कारखान्यात एकमेकांविरोधात आहोत. सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते असेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.(Gokul)

खासदार धनंजय महाडिक यांना टोला

खासदार धनंजय महाडिक यांनीही गोकुळच्या अध्यक्षपदावरून आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर, खासदार महाडीक यांचे गोकुळ संदर्भात ज्ञान कमी असल्याची टीका सतेज पाटील यांनी  केली. भीमा कारखान्याचे क्रशिंग किती झाले आहे हे त्यांनी सांगितले तर कोल्हापुरातील सहकाराला त्यांचे मार्गदर्शन होईल, असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला. कदाचित अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल, मात्र लवकरच यातून मार्ग निघेल असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.(Gokul)

अलमट्टीप्रश्नी खासदार महाडिकांनी माहिती घ्यावी

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार नसल्याचे खा धनंजय महाडिक म्हणत आहेत. मात्र धनजंय महाडिक आता खासदार झाले आहेत त्यांनी माहिती घेणे अपेक्षित असल्याचा टोला त्यांनी लगावला. केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात तीन राज्यांच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. कृष्णा लवादाने निर्णय दिलेला आहे केंद्राने त्याचा गॅझेट काढायचा आहे.  ते गॅझेट काढू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक सरकारने निधीची तरतूद केली असून जागाही हस्तांतरित केली आहे. मग स्थगिती कशाची आहे. याची खासदारांनी माहिती घ्यावी ते दर आठवड्याला दिल्लीत जातात. असा टोलाही त्यांनी लगावला.

Related posts

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर

१५ लाख फॉलोअर्स असलेल्या कुत्र्याच्या मृत्यूची कहाणी

सह्याद्रीत साकारले ‘पक्ष्यांचे गाव’