Gaza peace plan  : ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला हमास राजी

Gaza peace plan

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या  गाझा शांतता योजनेला पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेने सहमती दर्शवली आहे. अटी पूर्ण झाल्यास सर्व इस्त्रायली बंधकांना सोडण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी इस्त्रायलला ओलिसांच्या सुटकेसाठी बॉम्बफेक थांबवण्यास सांगितले आहे. हा करार अखेर अयशस्वी झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. हमासने एकूण २०-कलमी योजना स्वीकारली नसली तरी, त्यांनी हा प्रस्ताव अंशतः स्वीकारला आहे आणि  योजनेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. (Gaza peace plan)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वीस कलमी गाझा शांतता योजनेला शनिवारी हमासने मान्यता दर्शवली आहे. सर्व इस्त्रायली बंधकांना सोडण्यावर एकमत झाले आहे. पण हमासने हेही स्पष्ट केल आहे की अमेरिकेच्या मध्यस्तीने आखलेल्या वीस कलमी शांतता योजनेतील अनेक तरतुदींवर पुढील वाटाघाटी होती. गाझाच्या भविष्यातील प्रशासनाशी आणि प्रदेशातील त्यांच्या स्वत:च्या भूमिकेशी संबधित महत्वाच्या कलमांवर त्यांनी माघार घेतली आहे. अटी पूर्ण झाल्यानंतर सर्व जिवंत आणि मृत इस्त्रायली कैद्यांना सोडण्यास हमासने सहमती दर्शवली आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे. (Gaza peace plan)

 ट्रम्प यांनी हमासला शांतता योजना स्वीकारण्याठी रविवारची अंतिम मुदत दिली होती. योजना न स्वीकारल्यास सर्वांनी नरकात जाण्यास तयार रहावे असा इशारा ट्रम्प यांनी सोशल मिडियावर दिला होता. हमासने कायमस्वरुपी शांततेसाठी तयार आहे. इस्त्रालयने गाझावरील बॉम्बहल्ले तात्काळ थांबवावेत. जेणेकरुन आपण ओलिसांना सुरक्षितपणे लवकर बाहेर काढू शकू असे आवाहन केले आहे. तसेच शांततेसाठी या आधीच चर्चा सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. (Gaza peace plan)

अमेरिकन योजनेत तात्काळ युद्धबंदी लागू झाल्यास गाझामधील शेकडो ताब्यात घेतलेल्या नागरिकांना सोडण्याच्या बदल्यासत वीस जिवंत इस्त्रायली ओलिसांची आणि मृतांची ७२ तासात सुटका करुन घेण्याची मागणी केली आहे. दोन्ही बाजुने सहमती झाल्यावर गाझामध्ये मानवतावादी मदत पाठवली जाईल, हमासने अजूनही ४८ ओलिस ठेवले आहेत. त्यापैकी वीस जण जिवंत आहेत. (Gaza peace plan)

हमासच्या राजकीय ब्युरोच्या प्रमुखांचे मीडिया सल्लागार ताहिर अल-नौनौ यांनी बीबीसीला  असे सांगितले की  “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे विधान उत्साहवर्धक आहे.  कैद्यांची देवाणघेवाण, युद्ध संपवणे आणि माघार घेणे यासाठी त्वरित वाटाघाटी सुरू करण्यास तयार आहे.”

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या नेतृत्वाखालील हल्ल्यानंतर गाझामध्ये इस्रायलचे आक्रमण सुरू झाले, ज्यामध्ये सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि २५१ जणांना ओलिस ठेवण्यात आले. तेव्हापासून, हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये ६६,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत. (Gaza peace plan)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर