Ganesh Visarjan : पावसाच्या जलाभिषेकात घरगुती गणरायाला निरोप

Ganesh Visarjan

कोल्हापूर : प्रतिनिधी : सहा दिवसाच्या मुक्कामानंतर घरगुती गणरायाला पावसाच्या जलधारांच्या वर्षावात भावपूर्ण निरोप देण्यात आला. पारंपरिक वादयाच्या गजरात, चिरमुऱ्याची उधळण करत, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर अशी साद घालत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कोल्हापूर शहरात कुत्रिम कुंडात गणपती मूर्ती विसर्जन करत यंदाही चांगल्या उपक्रमाला भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला. (Ganesh Visarjan)

यंदा घरगुती गणरायांचा मुक्काम सहा दिवसांचा होता. सकाळ, संध्याकाळच्या आरत्या, भजन, किर्तन, आकर्षक आरास, गोड नैवेदयाची मेजवाणी यामुळे घरोघरी आनंदाचे वातावरण होते. गौराई आणि शंकरोबाचे तर घरोघरी जंगी स्वागत करण्यात आले. भाजी भाकरी वडी, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. सोमवारी रात्री महिलांनी झिम्मा फुगड्या खेळून गौरी गीतांनी रात्र जागवली. आज मंगळवारी घरगुती गणपती विसर्जनाचा दिवस असल्याने दुपारनंतर घरोघरी निरोपाच्या आरत्यांची तयारी झाली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मूर्ती चिरमुऱ्यांची मुक्त उधळण करण्यात आली. निरोपाच्या आरतीनंतर गणरायाला निरोप देण्यात आला. (Ganesh Visarjan)

नैसर्गिक जलस्त्रोताऐवजी नैसर्गिक विसर्जन कुंडासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे आहे. शहारातील प्रमुख चौक, उद्याने, शाळा मैदाने या ठिकाणी १६० कुत्रिम कुंडावर घरगुती गणेश मूर्तींचे अत्यंत भक्तीभावाने विसर्जन केले. महानगरपालिकेचे अडीच हजारहून अधिक कर्मचारी विसर्जनासाठी गुंतले होते. कुत्रिम विसर्जन कुंडात पाण्यासाठी महानगरपालिकेने पाण्याचे टँकर सज्ज ठेवले होते. इराणी खण परिसरात स्वयंचलित विसर्जन यंत्रावरुन मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. इराणी खणीत कन्व्हेअर बेल्ट या अत्याधुनिक तंत्राद्वारे विसर्जन करण्यात आले. २०२२ मध्ये तत्कालिन पालकमंत्री सतेज पाटील यांनी नाविण्यपूर्ण योजनेतून कन्व्हेटर बेल्ट यंत्रणा उभारणीसाठी ८० लाखांचा निधी दिला होता.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत इराणी खणीत १५ हजारहून अधिक मूर्तीचे विसर्जन झाले होते. कसबा बावडा राजाराम बंधाऱ्यांवर भाविकांनी नदीत मूर्ती विसर्जन न करता कुत्रिम कुंडात मूर्तींचे विसर्जन केले. इराणी खण, रंकाळा चौपाटी, पंचगंगा नदी जामदार क्लब, राजाराम तलाव, कोटीतीर्थ या परिसरात कुत्रिम कुंडात भाविकांनी मूर्तींचे विसर्जन केले. (Ganesh Visarjan)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक