Former corporators join BJP: ठाकरे गटाचे चार माजी नगरसेवक भाजपात

Former corporators join BJP

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र भाजपामध्ये ‘इनकमिंग’ सुरूच आहे. मालवण नगरपालिकेतील उद्धव ठाकरे गटाच्या चार माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी (१४ जुलै) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्हा प्रवक्ते मंदार केणी,  मालवण पालिकेचे माजी बांधकाम सभापती यतिन खोत, दर्शना कासवकर आणि सेजल परब यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती कमळ घेतले. (Former corporators join BJP)

प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून या सर्वांनी पक्षात प्रवेश केला आहे. भाजपा हा विकासासाठी कटीबद्ध आहे. विकसित भारत आणि महाराष्ट्रासाठी योगदान देईल. या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळेल. पक्षात प्रवेश केलेल्यांचा यथोचित सन्मान राखला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. (Former corporators join BJP)
या माजी नगरसेवकांबरोबरच ‘उबाठा’ शाखा प्रमुख भाई कासवकर, नितीन पवार, संजय कासवकर आणि सई वाघ, उपशहर प्रमुख नंदा सारंग, उपशहर प्रमुख युवासेना अमन घोडावले, आदींनी पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा :
 पुरे झाले, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा; आधी मराठी मुलूख सांभाळा
संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याने संतापाची लाट

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर