Expanding Kolhapur City : हद्दवाढीचा प्रस्ताव साठी महापालिका आयुक्तांना पत्र

Expanding Kolhapur City

कोल्हापूर  : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत आठ गावांना समावेश करावा, असे पत्र कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले. त्यामुळे शहर हद्दवाढीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. उचगांव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगांव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश करून प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्याबाबतच्या सूचना लेखी पत्राद्वारे दिल्या असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Extension Kolhapur City)

कोल्हापूर नगरपालिकेचे १५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालिकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. १९७२ पासून एक इंचही हद्दवाढ झाली नसल्याने कोल्हापूरच्या विकासावर मर्यादा येत आहेत, हि सत्यपरिस्थिती आहे. हद्दवाढ हि नैसर्गिक प्रक्रिया असून, हद्दवाढ होणे काळाची गरज आहे. याकरिता मंत्रालय स्तरावर बैठका, चर्चासत्र सुरु असून, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये शहराजवळील आठ गावे हद्दवाढीत समाविष्ट करून त्यासंदर्भातील अहवाल राज्य शासनाला पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याशी समन्वय साधून शहराशी एकरूप झालेल्या उचगांव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगांव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश करून प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्याबाबतच्या सूचना लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत. (Extension Kolhapur City)

महापालिका हद्दीच्या आसपास असणारी उचगांव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगांव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी हि गावे शहराशी एकरूप झालेली असून, कोल्हापूर महानगरपालिकेकडून या गावांना पाणीपुरवठा, केएमटी बससेवा या सेवा पुरवल्या जातात. उचगांव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगांव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश करून प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्याबाबतच्या सूचना लेखी पत्राद्वारे आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांना दिल्या आहेत. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबधित गावांना नोटीसा पाठवून त्यांचे ठराव घेतील. त्यानंतर सदर ठराव आणि हद्दवाढीचा प्रस्ताव ते राज्य शासनाकडे सादर करतील. यानंतर राज्य शासन संबधित आठ गावांच्या हद्दवाढीबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करेल आणि हद्दवाढीबाबत निर्णय घेईल, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. (Extension Kolhapur City)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर