स्वयंपाकाचा गॅस पुरवठ्यासाठी केंद्राकडून अत्यावश्यक सेवा परिक्षण कायदा लागू

Essential Services Testing Act applicable to cooking gas supply

नवी दिल्ली : प्रतिनिधी : घरगुती स्वयंपाकाचा गॅसचा अखंड पुरवठा करण्यासाठी आवश्यक वस्तू कायदा (ESMA) लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिटस् ना द्रवीभूत पेट्रोलियन गॅस (एलपीजी) चे जास्तीत जास्त उत्पादन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी हायड्रोकार्बन प्रवाह एलपीजीकडे वळवण्याचे आदेश दिले आहे. अत्यावश्यक सेवांचा विनाखंड पुरवठा करण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी या कायद्याद्वारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जेव्हा अत्यावश्यक सेवांमध्ये व्यत्यय आल्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होतो तेव्हा या कायद्याची अंमलबजावणी लागू केली जाते. (Essential Services Testing Act applicable to cooking gas supply)

आखाती युद्धामुळे इंधनाचे संकट जगावर आले आहेत. भारतातही त्याची झळ जाणवू लागली आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरचे बुकींग थांबवले आहे. त्याचा फटका हॉटेल व्यावसयासह अन्य व्यवसायांना जाणवू लागला आहे. घरगुती स्वयंपकाचा गॅस पुरवठा अखंडपणे सुरू रहावा यासाठी निर्णय घेतला आहे. नैसर्गिक वायूचा पुरवठा ज्या उद्योगांना केला जातो त्यांच्यावर मर्यादा आणल्या आहेत. खत प्रकल्पांना मागील सहा महिन्यांच्या सरासरी गॅस वापरांच्या ७० टक्के पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहे. तसेच चहा उद्योग आणि राष्ट्रीय गॅस ग्रीडद्वारे पुरवल्या जाणाऱ्या इतर औद्योगिक ग्राहकांना गॅस पुरवठा मागील सहा महिन्याचा पुरवठ्याचा विचार करुन ८० टक्के पुरवठा करण्यात येणार आहे. (Essential Services Testing Act applicable to cooking gas supply)

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या अचानक झालेल्या कमतरतेमुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे. तेल मंत्रालयाने गॅस परवठा सुरळीत करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. सिलिंडर गॅसचा पुरवठा बंद पडला तर हॉटेल, भोजनालये बंद पडू शकतात असा इशारा रेस्टॉरंट संघटनांनी दिला आहे. (Essential Services Testing Act applicable to cooking gas supply)

भारतात दरवर्षी अंदाजे ३१.३ दशलक्ष टन एलपजी वापरला जातो. त्यापैकी ८७ टक्के एलपीजी हा स्वयंपाकासाठी वापरला जातो. उर्वरित एलपीजी हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये वापरला जातो. भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केंद्रीय पेट्रोलियन आणि नैसर्गिक वायू मंत्रांना पत्र लिहून गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या