Environmentally Visarjan : कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन लाख मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन

Environmentally Visarjan

कोल्हापूर : प्रतिनिधी : नदी आणि जलस्त्रोतांचे प्रदूषण होऊ नये या राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देताना कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कृत्रिम कुंडात करण्यात आले. तसेच निर्माल्यदानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून १४० टन निर्माल्य दान झाले. त्यातून सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येणार आहे. (Environmentally Visarjan)

पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणाऱ्या जिल्ह्यातील गणेश भक्तांनी गेले अनेक वर्षे गणेशमूर्ती दान करण्यात अग्रेसर असतात. नदी प्रदूषण होऊ नये म्हणून महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जनाची तयारी केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी भाविकांनी स्वेच्छेने मूर्ती कुंडात विसर्जन केला.

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहारातील चौकाचौकात, शाळा, मैदाने, सांस्कृतिक सभागृहे आणि बागा अशा १६० ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती. भाविकांनी कृत्रिम कुंडात मूर्तींचे विसर्जन केले. तसेच आर.के.नगर, पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, फुलेवाडी, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी या उपक्रमात सहभागी झाले होते. भाविकांनी विसर्जन केलेल्या मूर्ती टेंपो, ट्रॅक्टरमधून इराणी खणीत आणली गेली. तिथे विधीवत विसर्जन करण्यात आले. इराणी खणीत तराफे, क्रेन, कन्व्हेटर बेल्टच्या माध्यमातून ५० हजार हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. निर्माल्य संकलनासाठी वेगळी व्यवथा करण्यात आली होती. (Environmentally Visarjan)

इराणी खणीमध्ये ६० हजार ३४१  मूर्ती इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या.  घरगुती गौरी-गणपती विसर्जनाकरिता महापालिकेच्यावतीने सर्व यंत्रणा मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून दुस-या दिवशी पहाटे साडेचार वाजेपर्यंत काम करत होती. यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पवडी, आरोग्य विविध विभागाचे असे सुमारे तीन हजार कर्मचारी, गणेश मूर्ती संकलनासाठी २०५ वाहने ४८  हमाल, सात जे.सी.बी., सात डंपर, आठ ट्रॅक्टर, चार पाण्याचे टँकर, दोन बुम, पाच ॲम्ब्युलन्स व पाच साधे तराफे व १० फ्लोटिंगचे तराफे अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी साधनसामग्रीसह तैनात करण्यात आले होते. निर्माल्य गोळा करण्याचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने १३आरोग्य निरिक्षकच्या टीम व अवनी संस्थेच्या १५० महिला सदस्य निर्माल्य संकलित केले. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ९५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. . संकलित करण्यात आलेले निर्माल्य पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेशन हॉस्पिटल येथे खत तयार करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

इराणी खण येथील गणेश मूर्ती विसर्जनाच्या स्वयंचलित यंत्राद्वारे ११ हजार ५६७ घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्यावतीने घरगुती गणेश मूर्तींचे विर्सजन इराणी खणीमध्ये करण्यासाठी स्वयंचलित यंत्र २०२३ या वर्षी बसविण्यात आले होते.

सदरचे नियोजन प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप-आयुक्त कपिल जगताप, परितोष कंकाळ, सहा.आयुक्त कृष्णात पाटील, संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर व जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर रचनाकार एन. एस. पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, मुख्य आरोग्य निरिक्षक विजय पाटील, मुख्य अग्निशनम अधिकारी मनीष रणभिसे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, विद्युत अभियंता अमित दळवी,  पुजारी, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्रांबरे, वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे व कर्मचाऱ्यांनी केले.                                                                        

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्यावतीने पर्यावरणपूरक विसर्जनाची सोय केली होती. ग्रामस्थांच्या पुढाकाराने भाविकांनी नदी आणि पिण्याचे पाण्याचे तलाव वगळता खणीमध्ये विसर्जन करण्यात आले. ग्रामीण भागात २०१५ पासून हा उपक्रम राबविला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम मूर्ती आणि निर्माल्य दान उपक्रमास ३० वर्षापूर्वी सुरूवात झाली होती. त्याला भाविकांकडून चांगला प्रतिसाद लाभत असून प्रत्येक वर्षी या उपक्रमात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली आहे. (Environmentally Visarjan)

Related posts

‘निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर’ या पुस्तकाचे प्रकाशन

बर्फाची चादर हरवली, हिमालयातील अर्थव्यवस्था ढासळली

आयएमडीचा अंदाज; यंदा आठ टक्के कमी पाऊस