मुंबई : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळी रायगड जिल्ह्यात एका ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत राज्यातील पाऊसबळींची संख्या आठ झाली आहे. (Eight rain victims)
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, मुरुड तालुक्यातील मिठेखर गावात घरावर भूस्खलन झाल्याने ही घटना घडली. मृत महिलेचे नाव विठा मोतीराम गायकर असे आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मुरुड तहसीलदारांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. भूस्खलनाच्या शक्यता असलेल्या भागातील रहिवाश्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. (Eight rain victims)
गायकर यांच्या मृत्यूनंतर गेल्या दोन दिवसांत राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांची संख्या आठ झाली आहे. महाराष्ट्रात यापूर्वी संततधार पावसामुळे सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता, असे सरकारी प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत पूर परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले, या सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी आहे.
प्रशासन सखल भागातून स्थलांतराचे सक्रियपणे समन्वय साधत आहे, पूरप्रवण क्षेत्रांवर लक्ष ठेवून आहे आणि बचाव पथकांना निर्देश देत आहे. नांदेड जिल्ह्यातील पुरामुळे बाधित झालेल्या गावांमधून २९० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि लष्कर मदत कार्यासाठी तैनात आहे. (Eight rain victims)
कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव
हवामानशास्त्रज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या प्रणालीमुळे आणि मान्सूनच्या वाऱ्यांमुळे मुसळधार पाऊस पडला आहे. पुणे येथील भारतीय हवामान विभाग (IMD) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘‘या प्रणालीमुळे उत्तर कोकण ते केरळ पर्यंत पसरलेला एक ट्रफ लाईन सक्रिय झाली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटांवर खूप मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडत आहे. राज्याच्या इतर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.’’
पुढील दोन दिवसांत कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, आठवड्याच्या अखेरीस पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
१० लाख हेक्टर पीक पाण्याखाली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले की, महाराष्ट्रातील सुमारे १० लाख हेक्टर शेती जमीन सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेली आहे. गडचिरोलीमध्ये, पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहत असल्याने भामरागड तालुक्यातील ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. कोडपे गावातील १९ वर्षीय तरुण वाहत्या ओढ्यातून वाहून गेला.