गौहत्ती : तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा, तुम्हाला आपटून मारू,…लक्षात ठेवा तुम्ही आमच्या पैशावर जगता, असे वक्तव्य भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी (७ जुलै) केले. ठाकरे बंधूंचे नाव न घेता दुबे यांनी हे वक्तव्य केले. (Dube Challenges Thackray)
हिंदी भाषा सक्तीचे आदेश महाराष्ट्र सरकारने मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा घेतला होता. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, मराठी न बोलणाऱ्यांना चोपून काढा, पण अशा घटनांचे व्हिडीओ रेकॉर्ड करू नका, असे म्हटले होते. त्यानंतर सोमवारी दुबे यांनी कुणाचेही नाव न घेता प्रत्युत्तर देत नवा वाद निर्माण केला.
दुबे म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणताय की लोकांनी मराठी बोलले पाहिजे. तुम्ही कोणाची भाकरी खाताय? टाटा, बिर्ला आणि रिलायन्स फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. टाटांनी येथे (बिहारमध्ये) आपला पहिला कारखाना स्थापन केला. तुम्ही लोक आमच्या पैशावर जगताहात, हे लक्षात घ्या.’’ (Dube Challenges Thackray)
राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना दुबे यांनी, त्यांनी उर्दू, तमिळ किंवा तेलगू बोलणाऱ्यांनाही मारहाण करावी, असे आव्हान दिले.
‘‘जर तुम्ही हिंदी भाषिकांना मारहाण करत असाल तर तुम्ही उर्दू, तमिळ आणि तेलगू बोलणाऱ्यांनाही मारहाण करावी. जर तुम्ही इतके मोठे ‘बॉस’ असाल तर महाराष्ट्रातून बाहेर पडा, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या – तुम्हाला तुडवू. ही अराजकता चालणार नाही,’’ असा इशाराही दुबे यांनी दिला. (Dube Challenges Thackray)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बिगर-मराठी भाषिकांना लक्ष्य करण्याचा सल्ला दिला होता, त्यावर भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी प्रत्युत्तर देत राजकीय वाद निर्माण केला.
हेही वाचा :
बिहारनंतर आता प.बंगाल आणि दिल्लीत मतदार तपासणी मोहीम
निवडणूक आयोगाविरोधात ‘इंडिया’कडून ‘बिहार बंद’ची हाक