दुबईहून बाशिंग बांधून आला पण…

Dubai Returned Groom

जालंधर : तो दुबईत नोकरीला आणि ती जालंधरच्या मोगा शहरातील. दोघांची ओळख ‘इन्स्टा’वर झालेली. तीन वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही लग्नाला होकार कळवला. तारीख ठरली. दुबईहून महिन्यापूर्वी तो गावी आला. सजवलेल्या कारमधून जवळपास दीडशे पाहुणे घेऊन तो तिच्या गावी आला. पण ‘इन्स्टा’वरची ‘ती’ गायब झाली आणि लग्नस्थळही अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाल्यावर नवऱ्या मुलासह वऱ्हाडी मंडळींना भोवळ यायची राहिली. (Dubai Returned Groom)

वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतासाठी घरचे लोक येतील, असे तिने त्याला सांगितले होते. त्यानुसार ते वाट पाहू लागले. पण पाच तास झाले तरी कुणी फिरकले नाही. तिच्या फोनवर सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन स्वीच ऑफ…

वऱ्हाड घेऊन आलेला तरुण फिर्याद दाखल करण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात गेला. विशेष म्हणजे लग्नाची तयारी करण्यासाठी तिला त्याने ५० हजार रुपयेही दिले होते. तेही गेले आणि तीही गेली. अखेर दुबईहून लग्नगाठ बांधण्यासाठी आलेला हा तरुण तसाच परतला. इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्याने द हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. (Dubai Returned Groom)

दीपक कुमार असे या तरुणाचे नाव. तिचे नाव मनप्रीत कौर. त्याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तीन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर मनप्रीतची भेट झाली होती. त्यांचे चॅटिंग सुरू झाले. दोघे प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पालकांचे फोनवर बोलणे झाल्यानंतर ६ डिसेंबर ही लग्नाची तारीखही ठरली.

मनप्रीतने वकील असल्याचे तसेच फिरोजपूरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे सांगितले होते, असेही त्याने पोलिसांना सांगितले. दीपकने सांगितले की, तो मनप्रीतला प्रत्यक्षात कधीच भेटला नव्हता, पण इंस्टाग्रामवर तिचे फोटो पाहिले होते. तिने ‘रोझ गार्डन पॅलेस’ येथे लग्नस्थळ असल्याचे सांगितले होते. परंतु ते मोगा येथे पोहोचले तेव्हा त्यांना असे कोणतेही ठिकाण येथे नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा :

Related posts

JNU Election Results

JNU Election Results: ‘जेएनयू’चा गड डाव्या आघाडीने राखला

Obscene content in OTT

Obscene content in OTT: ‘ओटीटी’वरील अश्लीलता गंभीर

suspension of indus water treaty

suspension of indus water treaty: सिंधू जलकरार स्थगितीचे नेमके काय परिणाम?