शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती

Dr. Jyoti Jadhav Appointed as Pro-Vice-Chancellor of Shivaji University

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज जाहीर केले. डॉ. जाधव या शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्रभारी प्र-कुलगुरू होत्या. त्या आज शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्र-कुलगुरू ठरल्या आहेत.

कुलगुरू डॉ. कामत यांनी डॉ. जाधव यांना आज दुपारी कुलगुरू कार्यालयात नियुक्तीचे पत्र प्रदान केले तसेच पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. या संदर्भात कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, डॉ. ज्योती जाधव यांचे शैक्षणिक आणि संशोधकीय योगदान उच्च दर्जाचे आहे. त्यांच्या या अनुभवाचा लाभ शिवाजी विद्यापीठाला निश्चितपणे होईल, याची खात्री वाटते. त्यांच्या रुपाने एक करवीरकन्या शिवाजी विद्यापीठाची पहिली महिला प्र-कुलगुरू होत आहे, याचा आनंद वाटतो. (Dr. Jyoti Jadhav Appointed as Pro-Vice-Chancellor of Shivaji University)

त्याचप्रमाणे कुलगुरूंनी आज सर्व विद्याशाखांच्या प्रभारी अधिष्ठाता यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये डॉ. राजाराम गुरव (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा), डॉ. महादेव देशमुख (मानव्यविज्ञान विद्याशाखा), डॉ. वर्षा मैंदर्गी (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) आणि डॉ. अजय साळी (आंतरविद्याशाखा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Dr. Jyoti Jadhav Appointed as Pro-Vice-Chancellor of Shivaji University)

शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांवर भर: डॉ. ज्योती जाधव…. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती केल्याबद्दल डॉ. ज्योती जाधव यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना ‘लर्नर टू अर्नर’ बनविणारे शिक्षण देणे, विद्यापीठातील संशोधनाला जागतिक ओळख प्राप्त करून देणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अभिनव उपक्रम राबविणे या त्रिसूत्रीवर काम करीत विद्यापीठाला नव्या उंचीवर नेण्याचा मानस डॉ. जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. (Dr. Jyoti Jadhav Appointed as Pro-Vice-Chancellor of Shivaji University)

Related posts

कांदा दरवाढीच्या मागणीसाठी महाविकास आघाडी रस्त्यांवर

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचे नाव

अमेरिकेचा इराणवर हल्ला; शांतता चर्चेला तडा?