सफाई कर्मचारी दांपत्याने केला १० लाखांचा हिऱ्याचा हार परत

Diamond necklace returned from sanitation workers

मुंबई : प्रतिनिधी : कचऱ्याच्या डब्यात सापडलेला १० लाख किंमतीचा हिऱ्याचा हार सफाई कर्मचारी पती पत्नीने परत केला. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Diamond necklace returned from sanitation workers)

मिळालेल्या माहितीनुसार मिरारोड पूर्वीच्या गौरव गॅलेक्सि फेस-१ या परिसरात गीतादेवी रंगू राहतात. शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी त्याचा हिऱ्याचा हार गहाळ झाला. त्यांनी संपूर्ण घरात हिऱ्याचा हार शोधला पण मिळाला नाही. हिऱ्याचा हार कचऱ्याच्या डब्यातून गेला असावा असा कयास त्यांनी लावला. त्यानंतर परसरातील सर्व कचऱ्यांच्या डबऱ्याचा शोध घेण्यात आला. तीन तासाच्या अथक परिश्रामानंतर एका कचऱ्याचा डब्यात हार सापडला. साफसफाई करणारे रमेश समदरी बैध आणि त्यांची पत्नी पल्लवी बैध यांनी कामगार संघटनेचे प्रभाकर गायकवाड या घटनेची माहिती दिली. दहा लाख रुपयांचा हार मालकांना सुपूर्द करण्यात आला. बैध दांपत्य मागील २७ वर्षपासून मिरारोड पूर्व परिसरात साफ सफाईचे काम करत आहेत. या सफाई कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Diamond necklace returned from sanitation workers)

Related posts

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप