चार मजली इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू

Nine people died after a four-storey building collapsed

ठाणे : प्रतिनिधी : ठाण्यातील भिवंडीमध्ये धोकादायक चार मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घडली. घटनास्थळावर बचावपथके कार्यरत आहेत. (Nine people died after a four-storey building collapsed)

भिवंडीतील नारपोली भागातील गंगाराम वाडी परिसरातील कोहिनूर या चार मजली इमारतीचा काही भाग पत्यांच्या बंगल्याप्रकरणा कोसळला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेत दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सहा ते सात जण अडकल्याची माहिती होती. घटनास्थळी एनडीआरएच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. शुक्रवारी सकाळी नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने बचाव कार्यात अडथळे आले होते. (Nine people died after a four-storey building collapsed)

मिळालेल्या माहितीनुसार कोहिनूर अपार्टमेंट २००७ मध्ये बांधण्यात आली होती. अपार्टमेंटचे दोन भाग असून दोन अपार्टमेंटमध्ये ३० खोल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम कुमकुवत असल्याने ही इमारत धोकादायक घोषीत करण्यात आली. ही इमारत धोकादायक होती. इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर एका पिलरची दुरुस्ती सुरू होती. दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळी सहा नंतर इमारतीला तडे जाण्यास सुरूवात झाली होती. रात्री आठ वाजता इमारत झुकत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी होते. त्यावेळी इमारत निर्मुनुष्य केली होती. पण काही कुटुंबातील सदस्य आपले साहित्य आणण्यासाठी इमारतीत गेले असताना इमारत कोसळली आणि ढिगाऱ्याखाली अडकले. (Nine people died after a four-storey building collapsed)

Related posts

..यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो’; मंत्रालयातील कँटीनबद्दल न्यायालयाचे ताशेरे 

सुनील तटकरे यांच्या भाच्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे उघडले