अनिल अंबानींना आवडते सोनेरी केसांची गोरी महिला

Details of the conversation between Epstein and Anil Ambani have emerged

 एप्सटीन फाइल्समधील नव्या कागदपत्रांमध्ये जेफ्री एप्सटीन आणि भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांच्यातील संभाषणाचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. या संभाषणात एका “उंचस्वीडिशगोरीसोनेरी केसांची महिला” देण्याची ऑफर दिल्याचा उल्लेख आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या या कागदपत्रांनुसार२०१७ ते २०१९ या काळात एप्सटीन आणि अनिल अंबानी यांच्यात सातत्याने संपर्क होता. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसारया संभाषणांमध्ये व्यवसायआंतरराष्ट्रीय घडामोडी आणि महिलांबाबत चर्चा झाली होती.

“मजेदार” भेटीसाठी महिलांची ऑफर

नऊ मार्च २०१७ रोजीच्या एका संभाषणात अनिल अंबानी यांनी एप्सटीनला विचारलं, “काय सुचवाल?” यावर एप्सटीनने उत्तर दिले की, भेट “मजेदार” बनवण्यासाठी “उंच, स्वीडिश, गोरी, सोनेरी केसांची महिला” चांगली राहील. यावर अनिल अंबानी यांनी लगेच उत्तर दिलं, “ताबडतोब अरेंज करा.” यानंतर एप्सटीनने पुन्हा लिहिले की, जर तुम्हाला कुणाला गुपचूप भेटायचे असेल, तर कधीही मला सांगा.

 २०१७ मध्ये एप्सटीननं अनिल अंबानी यांना महिलांबाबत त्यांची आवड विचारली होती. अंबानी यांनी बॉलिवूड आणि हॉलीवूडमधील आपल्या संपर्कांचा उल्लेख केला. एप्सटीनने विचारले, “तुम्हाला एखादी अभिनेत्री किंवा मॉडेल आवडते का? आशा आहे ती मेरिल स्ट्रीप नसेल — कारण तिथे मी मध्यस्थी करू शकणार नाही.” यावर अंबानी म्हणाले, “माझ्या मित्रा, आमची अभिरूची चांगली आहे. आमचा पुढचा चित्रपट स्कारलेट जोहान्सन सोबत आहे.” यावर एप्सटीननं प्रतिक्रिया दिली, “मला आनंद आहे की तुम्हाला तरुण, गोऱ्या महिला आवडतात.” (Details of the conversation between Epstein and Anil Ambani have emerged)

 या चॅटमधून हेही स्पष्ट होतं की, एप्सटीन सतत आपल्या मोठ्या नेटवर्कमधील लोकांची नावे वापरत होता. याच काळात एप्सटीनने अनिल अंबानी यांच्याबाबत शक्य तिथून माहिती गोळा करायला सुरुवात केली. फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यानं वेलनेस गुरु दीपक चोप्रा यांना विचारलं की त्यांना अनिल अंबानी यांच्याबद्दल काय माहिती आहे. यावर दीपक चोप्रा म्हणाले, “खूप श्रीमंत, सतत लक्ष आकर्षित करून घेणारे, सेलिब्रिटींच्या संपर्कात राहणारे, अनेक व्यवसाय करतात वगैरे. दोघा भावांमध्ये फारसं जमत नाही.”

एप्सटीननं उद्योगपती टॉम प्रिट्झकर यांनाही विचारलं की ते मुकेश अंबानींच्या जवळचे आहेत की अनिल अंबानींच्या? त्यानंx व्हेंचर कॅपिटलिस्ट पीटर थील यांनाही अनिल अंबानींना भेटण्याचा सल्ला दिला. याशिवाय, एप्सटीननं अंबानी कुटुंबावरची अनेक पुस्तकंही मागवली होती.

इथं लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे एप्स्टिन आणि अंबानी यांच्यातलं हं संभाषण २०१७ ते २०१९च्या काळात आहे. आणि त्याआधी सुमारे दहा वर्षे एप्सटीनला २००८ मध्ये अल्पवयीन मुलींशी संबंधित लैंगिक गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली होती. तरीही तो जगभरातील प्रभावशाली आणि शक्तिशाली लोकांच्या संपर्कात होता. नोंदींनुसार, अनिल अंबानी आणि एप्सटीन यांची पॅरिस आणि न्यूयॉर्कमध्ये भेटीची योजना होती. मे २०१९ मध्ये अनिल अंबानी न्यूयॉर्कला गेले असताना, एप्सटीनने त्यांना मॅनहॅटनमधील आपल्या घरात बोलावलं होतं. (Details of the conversation between Epstein and Anil Ambani have emerged)

इतर ईमेल्समधून असेही समोर आलं आहे की दोघांमध्ये आंतरराष्ट्रीय दौरे, बिझनेस मीटिंग्स आणि जागतिक मंचांवरील कार्यक्रमांबाबत चर्चा झाली होती. यामध्ये पॅरिस, न्यूयॉर्क आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील भेटींचा उल्लेख आहे. जानेवारी २०१८ मध्ये डावोस (स्वित्झर्लंड) येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान डोनाल्ड ट्रंप यांच्यावर झालेल्या प्रतिक्रियांवरही चर्चा झाली होती.

अनिल अंबानी व्यतिरिक्त काही भारतीय आणि भारतीय वंशाचे सेलिब्रिटी एप्सटीनच्या संपर्कात होते. यामध्ये मीरा नायर, अनुराग कश्यप, नंदिता दास यांचा समावेश आहे. मात्र हे सर्व एका चित्रपटविषयक कार्यक्रमापुरतेच संपर्कात होते, त्यापलीकडे काही तपशील आढळलेला नाही. मात्र दीपक चोप्रा आणि बिल गेट्स यांच्याबाबत गंभीर आरोप समोर आले असून, काही पीडित महिलांनी त्यांची नावे घेतली आहेत. एप्सटीन फाइल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेखही अनिल अंबानींच्या संदर्भात आला आहे. तथापि, फाइलमध्ये नाव असणे म्हणजे गुन्हा सिद्ध होतो असं नाही. पण एप्सटीनसोबतचे संबंध नक्कीच उघड होतात. (Details of the conversation between Epstein and Anil Ambani have emerged)

अनिल अंबानी आणि एप्सटीन यांच्यातील संभाषणात महिलांची पेशकश केल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. सध्या या प्रकरणावर अनिल अंबानींच्या प्रतिनिधींनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र आता अनिल अंबानी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुकेश अंबानी हे देशातील मोठे उद्योगपती असले तरी अनिल अंबानी हे पंतप्रधान मोदींच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, अनिल अंबानींच्या रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रूपला विविध क्षेत्रांत फायदा झाल्याचे आरोप विरोधकांनी केले. यातला सर्वात मोठा सौदा होता राफेल विमान कराराचा. फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करताना अनिल अंबानींच्या कंपनीला ऑफसेट पार्टनर बनवण्यात आलं. काँग्रेससह विरोधकांचा आरोप होता की, अनुभव नसतानाही हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला बाजूला सारून अनिल अंबानींना फायदा दिला गेला. माजी फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्राँस्वा ओलांद यांनीही म्हटले होतं की, अनिल अंबानींची निवड भारत सरकारनं केली होती, दसॉल्टने नाही. सरकार आणि अंबानी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

२०१७-२०१९ दरम्यान अनिल अंबानी यांनी अमेरिकेतील राजकीय वर्तुळात पोहोच मिळवण्यासाठी एप्सटीनसारख्या वादग्रस्त व्यक्तीशी संपर्क ठेवला. दस्तावेजांनुसार, अंबानी यांनी “दिल्लीतील नेतृत्वाच्या वतीने” (म्हणजे मोदी सरकार) जेरेड कुशनर आणि स्टीव्ह बॅनन यांची भेट घडवून आणण्याची मागणी केली होती. यातून अंबानी स्वतःला मोदी सरकारसाठी एक अनौपचारिक दुवा (बॅकचॅनल) म्हणून सादर करत होते, पण त्यांना त्याचा अधिकार होता की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. (Details of the conversation between Epstein and Anil Ambani have emerged)

२०१९ मध्ये मोदी पुन्हा निवडून आले त्या दिवशी अंबानी आणि एप्सटीन यांची भेट झाली होती. त्यानंतर एप्सटीनने बॅननला मोदींच्या “प्रतिनिधी”शी बोलल्याचे सांगितले. अलीकडच्या काळात अनिल अंबानींच्या कंपन्या मोठ्या कर्जात अडकल्या असून ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जात आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अनिल अंबानींची मोदींशी आधी जवळीक होती. मात्र अलीकडच्या काळात संबंध ताणले गेले आहेत. एकूणच, अनिल अंबानी आणि मोदी सरकार यांचे संबंध राफेल वाद, एप्सटीन फाइल्स आणि आर्थिक संकटामुळे अत्यंत वादग्रस्त बनले आहेत.काही बातम्यांनुसार एप्सटीनच्या सल्ल्यानेच अनिल अंबानींनी स्वतःला दिवाळखोर घोषित केल्याचं सांगितलं जातं.

अनिल आणि मुकेश या दोन्ही भावांमध्ये अनिल रंगीला असल्याचं दिसत होतं. मुकेश अंबानी मात्र सुरुवातीला कधीही प्रसिद्धीच्या झोतात नव्हते. मात्र त्यांनीच नंतर मोठे साम्राज्य उभे केले. अनिल अंबानी चमकोगिरी करीत करीत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे एप्स्टिनसोबतचा त्यांचा व्यवहार कुणालाही आश्चर्यकारक वाटत नाही. मात्र ते ही मध्यस्थी मोदी सरकारच्या वतीने करताहेत का, हा खरा प्रश्न आहे. (Details of the conversation between Epstein and Anil Ambani have emerged)

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

आपले घर, आपला किल्ला !

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या