Delhi Election : दिल्लीचा बिगुल वाजला

Delhi Election

Delhi Election

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेचा बिगुल वाजला. पाच फेब्रुवारीला मतदान एकाच टप्प्यात मतदान होईल. त्यानंतर लगेच ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येईल. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी निवडणुकांचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला. दिल्ली विधानसभेच्या ७० जागा आहेत.(Delhi Election)

‘निवडणुकीची अधिसूचना १० जानेवारीला लागू होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी, छाननी १८ जानेवारी आणि माघारीची तारीख २० जानेवारी असेल. मतमोजणीनंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल,’ असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.(Delhi Election)

लोकशाही आणि सार्वत्रिक निवडणुका हा भारताचा मोठा वारसा आहे. आयोगात कोणत्याही प्रकारची अनियमितता नाही. किंवा तसे करण्याला कसलाही वाव नाही. आमच्यापैकी कुणाकडून वैयक्तिकरित्या काही चूक झाल्यास कारवाई करण्यास सक्षम आहोतक, असे राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.(Delhi Election)

मतदार याद्यांबाबत काटेकोर दक्षता

मतदार याद्यांमधून नाव वगळण्याबाबत किंवा वाढवण्याच्या प्रक्रियेत कसलीही अनियमीतता नाही. त्यासंदर्भातील प्रक्रियेचे काटेकोर पालन केले आहे, या शब्दांत राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाच्या आरोपांना उत्तर दिले.

मतदार यादीसंदर्भातील प्रक्रिया सतत सुरूच राहतात, आताही त्या सुरू आहेत. त्यात सुमारे ७० टप्पे आहेत. मतदार यादी, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, मतदान केंद्रे, फॉर्म १७ (सी), आणि मतमोजणी केंद्रे आदी टप्प्यांचा त्यात समावेश असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दिल्ली विधानसभेत सध्या आम आदमी पक्षाची सत्ता आहे.  त्यांची सत्ता खेचण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत हजारो कोटींच्या विकासप्रकल्पांच्या कामाचे उद्घाटन केले. त्यावेळी बोलताना मोदी यांनी आपचे समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले होते. दिल्लीवर आलेली ही ‘आपत्ती’ आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला केजरीवाल यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

हेही वाचा :

शक्तिशाली भूकंपाने तिबेट हादरला!

Related posts

Top Terrorist killed

Top Terrorist killed: ‘एलईटी’च्या दहशतवाद्याचा खात्मा

Waqf hearing in SC

Waqf hearing in SC: ‘वक्फ’ विरोधातील याचिका चुकीच्या गृहितकांवर

SC pulls up Rahul Gandhi

SC pulls up Rahul : सावरकरांबद्दल अवमानास्पद टिप्पणी कराल तर…