वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळातील असला तरी यावेळी आमच्या सरकारकडून तो कायम राहणार असून उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मार्गी लावला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ई-लॉबी व नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण व सहाय्य मंत्री, तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. (Ajit Pawar)
हेही वाचा :