Death toll of rain: महाराष्ट्रात १५ दिवसांत १८ पाऊसबळी

Death toll of rain

मुंबई : राज्यात गेल्या पंधरा दिवसांत अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पडझड झाली, आणखी काही दुर्घटना घडल्या. यांमध्ये १८ जणांचा बळी गेला आहे. तसेच विविध घटनांमध्ये ६५ जण जखमी झाले आहेत. (Death toll of rain)

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेच ही माहिती दिली आहे. यासंबंधीच्या एका अहवालात म्हटले आहे की, जोरदार पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये हे मृत्यू झाले आहेत. यात रस्ते अपघात, पुलावरून पडणे, बुडणे, वीज कोसळणे आणि आग लागून झालेल्या दुर्घटनांचा समावेश आहे. या कालावधीत सहा गुरांचाही मृत्यू झाला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

“१ जूनपासून राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये अठरा जणांचा मृत्यू झाला आहे. नैऋत्य मान्सूनमुळे गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे,” असे अहवालात म्हटले आहे. (Death toll of rain)

इंद्रायणीवरील शोधमोहीम सुरूच

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळलेल्या ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) आपली मोहीम थांबवली आहे.

१५ जून २०२५ रोजी मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील ३२ वर्षे जुना पूल कोसळला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि १८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

“जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सर्व बेपत्ता व्यक्तींची माहिती मिळाली असल्याने, शोधमोहीम बंद करण्यात आली आहे,” असे एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले. (Death toll of rain)

 “अजूनही कोणीही बेपत्ता असण्याची शक्यता नसली तरी, खबरदारीचा उपाय म्हणून, आम्ही स्थानिक बचाव गटांच्या मदतीने शोध मोहीम सुरू ठेवत आहोत, असे तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप रायन्नावर म्हणाले. या घटनेत अद्याप कोणी कुठे अडकले आहे का ते पाहण्यासाठी ही मोहीम सुरू ठेवली आहे. यात वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग ट्रेकर्स यांचे स्वयंसेवकही सहभागी झाले आहेत, असे ते म्हणाले. (Death toll of rain)

पूल कोसळल्यानंतर पाच मोटारसायकली नदीत कोसळल्या. या वाहनमालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी बहुतेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

जबाबदारी निश्चित करा : काँग्रेसची मागणी
पुण्याच्या मावळ तालुक्यामधील इंद्रायणी नदीवरील पादचारी पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल काँग्रेसने शोक व्यक्त केला आहे. या प्रकरणातील दोषींवर जबाबदारी निश्चित करावी. या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

हेही वाचा :
पावसाचा जोर वाढला….
लाज बाळगा; महाराष्ट्र सरकारला सुनावले

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?