Dalai Lama : उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार चीनला नाही : दलाई लामा

Dalai Lama

धर्मशाला : उत्तराधिकारी नेमण्याचा कोणताही अधिकार चीनला नाही. हा सर्वस्वी अधिकार गादेन फोडरंग ट्रस्टचा असेल, याचा पुनरूच्चार १४ वे दलाई लामा यांनी बुधवारी (२ जुलै) केला. (Dalai Lama)

केंद्र सरकारने दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याला मान्यता द्यावी, अशी मागणी बुधवारी चीनने केली आहे. या पार्श्वभूमीवर लामा यांनी हा अधिकार चीनला कदापी नाही, असे बजावले आहे. लामा यांनी, त्यांच्या मृत्यूनंतर पुनर्जन्म घेणारा त्यांचा उत्तराधिकारी असेल अशी घोषणा केली, या पार्श्वभूमीवर चीनकडून हे वक्तव्य आले आहे.

येत्या ६ जुलैला दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस साजरा होत आहे. बुधवारी हिमाचल प्रदेशातील मॅकलिओडगंज येथे दलाई लामा यांनी यांनी माध्यमांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आणि ट्रस्टचा संदेश वाचून दाखवला. (Dalai Lama)

“मी येथे पुन्हा सांगतो की गादेन फोडरंग ट्रस्टला भविष्यातील उत्तराधिकारी नेमण्याचा आणि त्याला मान्यता देण्याचा एकमेव अधिकार आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार इतर कोणालाही नाही,” असे ते म्हणाले.

दलाई लामा म्हणाले की, ट्रस्ट तिबेटी आध्यात्मिक प्रमुखांशी या विषयावर चर्चा करेल आणि त्यानुसार निर्णय घेईल. त्यांनी २०११ मध्येही असेच एक विधान जारी केले होते. त्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. (Dalai Lama)

‘‘२४ सप्टेंबर २०११ रोजी, तिबेटी आध्यात्मिक परंपरांच्या प्रमुखांच्या बैठकीत मी तिबेटमधील आणि बाहेरील तिबेटी, तिबेटी बौद्ध धर्माचे अनुयायी आणि तिबेट आणि तिबेटी लोकांशी संबंध असलेल्यांना दलाई लामाची संस्था सुरू ठेवावी की नाही याबद्दल एक निवेदन दिले. त्यात मी म्हटले होते की, १९६९ पर्यंत, मी स्पष्ट केले होते की संबंधित लोकांनी दलाई लामाचा उत्तराधिकारी भविष्यातही सुरू ठेवावा की नाही हे ठरवावे,’’ असे दलाई लामा म्हणाले. (Dalai Lama) ‘‘मी असेही म्हटले की : जेव्हा मी ९० वर्षांचा होईन, तेव्हा मी तिबेटी बौद्ध परंपरांमधील उच्च लामा, तिबेटी जनता आणि तिबेटी बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या इतर संबंधित लोकांशी सल्लामसलत करून दलाई लामाची संस्था सुरू ठेवावी की नाही याचे पुनर्मूल्यांकन करेन,’’ याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार