पार्थ पवारांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर; कुटुंबाच्या पुण्याईवर झालेला खासदार

Congress's Rebuttal to Parth Pawar's Criticism

मुंबई : प्रतिनिधी : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयश आले. काँग्रेसची शेवटपर्यंत संपर्क करुन काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरल्याने दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव खासदार पार्थ पवार यांनी टीका केली. काँग्रेसच्या डाऊनफॉलजी सुरुवात झाली आहे अशी टिप्पनी केली. त्यावर कुटुंबाच्या पुण्याईवर झालेला खासदार अशी टीका काँग्रेसने केली आहे. (Congress’s Rebuttal to Parth Pawar’s Criticism)

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा यापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पण काँग्रेसने निवडणूक लढवण्याची घोषणा करत आकाश मोरे यांच्या उमेदवारीची घोषणाही केली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता. पण काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरल्याने नाराज झालेल्या पार्थ पवारांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे अशी टीका केली. त्यावर काँग्रेस एक्स पोस्ट करत पार्थ पवारांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. एक्स पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. (Congress’s Rebuttal to Parth Pawar’s Criticism)

या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात एफआयआर नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे? (Congress’s Rebuttal to Parth Pawar’s Criticism)

पार्थ पवारांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेबद्दल शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न  विचारला असता ते म्हणाले, राजकारणामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागते. राजकारणातील परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही असे म्हणत पवारांनी पार्थ पवारांचे कान टोचले.

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या