Congress’s Protest : शाळेच्या खासगीकरणाविरोधात मंत्री लोढांना बांगड्यांचा आहेर

Congress’s Protest

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शिक्षण आणि आरोग्य हे जनतेचे मूलभूत अधिकार आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी १०० कोटी खर्च केले आहेत. भाजपा सरकार मात्र स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली या शाळा खाजगी लोकांच्या हाती देत आहे. याला पालकांचा व काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. भाजपा सरकारचा हा कुटील डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला. (Congress’s Protest)

महानगरपालिकेच्या मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाच्या विरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख यांनी पालक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत तीव्र आंदोलन करून सरकारला जाब विचारला. यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढांना भेटण्याचा काँग्रेस शिष्टमंडळाने प्रयत्न केला, पण पोलिसांनी भेटू दिले नाही. त्यामुळे संतप्त शिष्टमंडळाने पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि महायुती सरकारला बांगड्यांचा आहेर दिला. यावेळी पोलिसांशी त्यांची झटापट झाली. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.(Congress’s Protest)

यावेळी खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन यूपीए सरकारने मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) आणला. परंतु भ्रष्ट भाजपा सरकार हा मूलभूत अधिकारही गोरगरिबांकडून हिरावून घेत आहे. महापालिकेच्या शाळा सुरू ठेवणे हे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे. पण हे सरकार आपल्या बिल्डर मित्रांसाठी मनपाच्या शाळा बंद करून खासगी लोकांच्या घशात घालत आहे, असा आरोपही त्यांनी केला. आंदोलनात माजी नगरसेवक वीरेंद्र चौधरी, कमरजहा सिद्दिकी, राजपती यादव, बब्बू खान, अवनीश सिंग यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार