Congress’s post Gayab: काँग्रेसची पोस्ट ‘गायब…!’

Congress’s post Gayab

नवी दिल्ली : काँग्रेसने ‘एक्स’वर केलेल्या एका पोस्टने राजकीय पटलावर चांगलाच हल्लकल्लोळ माजवला आहे. त्यातही विशेषत: भाजपच्या गटात भलतीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पोस्टला उत्तर देण्यासाठी भाजपच्या आयटी सेलपासून वरिष्ठ नेतेही सरसावल्याचे दिसते. (Congress’s post Gayab)

काँग्रेसने ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये बिनचेहऱ्याचा नेता दाखवला आहे. वर कॅच लाईन आहे..‘जिम्मेदारी के समय-GAYAB’

आता या पोस्टमुळे भाजपमध्ये अस्वस्था निर्माण झाली असून, काँग्रेसवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. ‘ही आपल्या देशाची अखंडता कमकुवत करण्याचा प्रयत्न करणारी एक भयानक, विषारी योजना आहे,’ असा आरोप भाजपने केला आहे.

‘‘काँग्रेस पक्षाची ही निष्पापपणे केलेली पोस्ट नाही. ही आपल्या देशाची अखंडता कमकुवत करण्याचा आणि देशाच्या पंतप्रधानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणारी एक भयानक, विषारी योजना आहे,’’ असे भाजप नेते गौरव भाटिया यांनी म्हटले आहे. (Congress’s post Gayab)

पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना भाजप नेते गौरव भाटिया यांनी, या पोस्टवरून काँग्रेस पाकिस्तानला असे संकेत देत आहे की या दहशतवादी हल्ल्यात काँग्रेस पक्ष त्यांच्या देशासोबत नाही तर पाकिस्तानसोबत उभा आहे, असा गंभीर आरोप केला.

तर भाजप नेते अमित मालवीय यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘‘काँग्रेसने ‘‘सर तन से जुदा’’ या प्रतिमेचा वापर करून थोडीशी शंका सोडली आहे. हे केवळ राजकीय विधान नाही; ते त्यांच्या मुस्लिम मतपेढीला उद्देशून केलेले लांगूलचालन आहे पंतप्रधानांविरुद्ध एक गुप्त चिथावणी आहे.’’ (Congress’s post Gayab)

मालवीय म्हणाले की, अशा प्रकारच्या युक्त्या वापरण्याची काँग्रेसची ही पहिलीच वेळ नाही. राहुल गांधींवर त्यांनी पंतप्रधान मोदींविरुद्ध अनेक वेळा हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला. ‘‘ राहुल गांधींनी अनेकदा पंतप्रधानांविरुद्ध हिंसाचार भडकावला आहे. त्याचे समर्थनही केले आहे. मात्र काँग्रेस यात कधीही यशस्वी होणार नाही, कारण पंतप्रधानांना लाखो भारतीयांचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत. उलट, कोणाची मान कापली गेली असेल तर ती काँग्रेसची आहे. ती आता दिशाहीन, डोके नसलेली हायड्रा बनली आहे,’’ अशी टीका त्यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये केली आहे.

ऐक्य हेच काँग्रेसचे सूत्र : रमेश

भाजपने असे टीकास्त्र सोडल्यानंतर काँग्रेसच्या बचावासाठी काँग्रेस नेते जयराम रमेश पुढे आले. त्यांनी पहेलगाम हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीवेळी पंतप्रधान मोदी कुठे होते, असा सवाल केला.

‘‘पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हते. आम्ही २२ एप्रिल रोजी मागणी केली होती की या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. पंतप्रधान मोदींनी संसदेत होणाऱ्या चर्चेत भाग घ्यावा आणि हा दहशतवादी हल्ला कसा झाला हे आम्हाला सांगावे. यामागे आमचा कोणताही राजकीय अजेंडा नाही. काँग्रेसकडे फक्त एकच सूत्र आहे ते म्हणजे – ऐक्य,’’ असे रमेश यांनी म्हटले आहे. पहेलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणे टाळले. त्याऐवजी निवडणुका तोंडावर असलेल्या बिहारला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर विरोधी पक्षांनी तीव्र टीका केली होती.

हेही वाचा :
संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर