Delhi Assembly : दिल्ली निवडणुकीत काँग्रेसची भाजपबरोबर हातमिळवणी

नवी दिल्ली : आगामी दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली आहे, असा आरोप करत आम आदमी पार्टी (आप) ने गुरुवारी इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. (Delhi Assembly)

पत्रकार परिषदेत आप नेते संजय सिंह म्हणाले, ‘काँग्रेस भाजपला दिल्लीची निवडणूक जिंकून देण्यासाठी सर्व काही करत आहे.’ तर मुख्यमंत्री अतिशी यांनी, काँग्रेस पक्ष भाजपकडून प्रचारासाठी निधी घेत आहे, असा गंभीर आरोप केला.

काँग्रेस नेते अजय माकन यांनी आपचे प्रमख अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर कारवाई न झाल्यास काँग्रेसला इंडिया आघाडीतून काढून टाकण्यात यावे. काँग्रेस नेते माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना ‘देशद्रोही’ म्हटले होते. काँग्रेस पक्षाने २४ तासांच्या आत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. काँग्रेस नेते भाजपच्या स्क्रिप्टनुसार काम करत असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला. (Delhi Assembly)

यावेळी अतिशी म्हणाल्या, “काँग्रेसने दिल्ली निवडणुकीसाठी भाजपशी हातमिळवणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले होते. त्यांनी कधी भाजपच्या कोणत्याही नेत्यावर असे आरोप केले आहेत का? नाही. पण ते आपला लक्ष्य करत आहेत.

युवक काँग्रेसने अरविंद केजरीवाल आणि माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. भाजप संदीप दीक्षितसह काँग्रेस उमेदवारांना निधी देत ​​आहे, असे आम्हाला अधिकृत सूत्रांकडून समजले आहे. काँग्रेसने याचे उत्तर दिले पाहिजे. अन्यथा, आम्ही इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करू. काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढण्याची मागणीही आम्ही करू, असे त्या म्हणाल्या. (Delhi Assembly)

काय म्हणाले अजय माकन?

अजय माकन दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. २०१३ मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने आपला पाठिंबा दिला. काँग्रेस पक्षाचा हा निर्णय सर्वांत मोठी ‘धोरणात्मक चूक’ होती. कारण त्यामुळे दिल्लीत काँग्रेसचे पतन झाले. मला असे वाटते की आज दिल्लीची दुर्दशा झाली आहे. येथे काँग्रेस कमकुवत झाली आहे. कारण २०१३ मध्ये आम्ही ४० दिवस ‘आप’ला पाठिंबा दिला होता.

तर ‘अस्तित्वात नसलेल्या’ कल्याणकारी योजनांची आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा आरोप करत अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात युवा शाखेने तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आप काँग्रेसवर नाराज आहे. (Delhi Assembly)

दोघांपैकी कुणीही सत्तेवर येणार नाही : भाजप

दरम्यान, आप आणि काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने म्हटले आहे की, सहा महिन्यांपूर्वी इंडिया आघाडी म्हणून या दोन पक्षांनी निवडणुका लढवल्याचे दिल्लीच्या जनतेला आठवत असेल. आता हे लोक काय आहेत ते दिसून येत आहे. या पक्षांच्या मनात एकमेकांविरोधात किती द्वेष आहे ते लक्षात येते. दिल्लीच्या आगामी निवडणुकीत दोघांपैकी कोणीही सत्तेवर येणार नाही, अशी टीकाही भाजपने केली आहे.

हेही वाचा :

Related posts

Manmohan Singh कर्मयोगी

Manmohan Singh मेणाहून मऊ, वज्राहून कठोर

Manmohan Singh भारतीय राजकारणातील सभ्यता निमाली