Congress criticizes Modi: मोदी अमेरिकेतील भारतीयांचे रक्षण करण्यात अपयशी : काँग्रेस

Congress criticizes Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील भारतीयांचे रक्षण करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. तसेच भारत आणि भारतीयांचा योग्य तो सन्मान राखला जावा, याचे गांभीर्य त्यांना नाही, असा हल्लाबोलही काँग्रेसने केला आहे. (Congress criticizes Modi)

अमेरिकेतील विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला अत्यंत क्रूर अटकेचा आणि कथित हद्दपारीचा मुद्दा मंगळवारी (१० जून) काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लावून धरला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ‘‘ ते भारत आणि भारतीयांच्या सन्मानाचे रक्षण करण्यात सतत अपयशी ठरत आहेत,’’ असा आरोप केला. (Congress criticizes Modi)

रमेश यांनी या विद्यार्थ्याला अटक केल्याचे एका वृत्तपत्रात आलेले फोटो शेअर केले. यामध्ये असा दावा करण्यात आला होता की भारतीय विद्यार्थी रडत आहे आणि तो मानसिकदृष्ट्या ठीक नाही. त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

न्यू जर्सीतील नेवार्क विमानतळावरील या दृश्यात पोर्ट अथॉरिटी पोलिस कर्मचारी भारतीय विद्यार्थ्याला दाबून धरून त्याला अटक करताना दिसत आहेत.

अटकेची ही घटना रविवारी ‘एक्स’ वर कुमल जैन नावाच्या एका वापरकर्त्याने पहिल्यांदा शेअर केली होती.

त्यांनी या घटनेसंदर्भात काही पोस्ट लिहिल्या आहेत. (Congress criticizes Modi)

“मी काल रात्री नेवार्क विमानतळावरून एका तरुण भारतीय विद्यार्थ्याला हद्दपार होताना पाहिले. त्याला इजा पोहोचवली नव्हती, पण हातकड्या घातल्या होत्या, तो रडत होता, त्याला गुन्हेगारासारखे वागवण्यात आले. तो स्वप्नांचा पाठलाग करत आला होता, एक अनिवासी भारतीय म्हणून मला असहाय्य आणि हृदयद्रावक वाटले. ही एक मानवी शोकांतिका आहे,” असे त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले.

रमेश यांनी म्हटले आहे की, “मोदी सरकार भारत आणि भारतीयांच्या सन्मानाचे रक्षण करण्यात सतत अपयशी ठरत आहे.’’

“इतिहासात पहिल्यांदाच, भारताच्या अनुपस्थितीत एखाद्या परदेशी राष्ट्रप्रमुखाने भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा केली. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सतत भारतावर दबाव आणून युद्धबंदी लागू केल्याचा दावा करत आहेत. गेल्या एक वर्षापासून, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांवर आणि विद्यार्थ्यांशी वारंवार गैरवर्तन केले जात आहे, परंतु पंतप्रधान मोदी मौन बाळगत आहेत, किंवा ते बोलण्याचे धाडस करू शकत नाहीत, असे गृहीत धरले पाहिजे,’’ असे रमेश यांनी म्हटले आहे.  “ते भारताचे पंतप्रधान आहेत, भारत आणि भारतीयांच्या सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणे ही त्यांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे.

हेही वाचा :
शहांचा शांततेचा दावा हास्यास्पद : काँग्रेस
आगामी निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल : पवार

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या