Clashes erupt in Nagpur:  नागपुरात दंगल, जाळपोळ

Clashes erupt in Nagpur

Clashes erupt in Nagpur

नागपूर : नागपूर येथील महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले. घोषणाबाजी झाली. त्यानंतर लगेचच तुफान दगडफेक सुरू झाली. हाणामारी करण्यात आली. परिसरातील वाहनांना लक्ष करण्यात आले. काही वाहनांना आग लावण्यात आली. काहींची मोडतोड करण्यात आली. (Clashes erupt in Nagpur)

पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांची नळकांडी फोडली. दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलिस कर्मचारीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. दंगलसदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा मागवण्यात आला आहे.

सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या प्रश्नांवर आंदोलन सुरू आहेत. सोमवारी (१७ मार्च) बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी आंदोलन केले. नागपुरातही या प्रश्नांवर आंदोलन झाले, पण संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास या प्रश्नांवर दोन्ही गट समोरासमोर आले. त्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. जमावाने काही वाहनांना आगी लावल्या. (Clashes erupt in Nagpur)

या घटनेचे वृत्त समजतात महाल परिसरात पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमारही केला. पण जमावाने त्यांच्यावरही दगडफेक केली. त्यामध्ये काही पोलिस जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांची नळकांडी फोडावी लागली. दंगलसदृश परिस्थिती काबूत आणण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा मागवण्यात आला आहे. (Clashes erupt in Nagpur)

नागपूरच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, यासंदर्भात तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. चौकशी सुरू आहे. कुणावरही पोलिस बळाचा वापर करण्याची इच्छा नाही, मात्र कुणीही गैरकृत्य करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र कुणी कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास सक्त कारवाई येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, रात्री दहापर्यंत पोलिसांनी दंगेखोरांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जमाव शांत झालेला नव्हता.

मुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. (Clashes erupt in Nagpur)

गडकरी म्हणाले की, नागपूर हे अत्यंत शांततेचे शहर आहे. येथे कधीही दंगल घडत नाही. नागरिकांनी शांतता पाळावी. कुणीतरी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यातून धार्मिक तणाव निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली. जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, सर्वांनी शहरातील सलोख्याचे आणि शांततेचे वातावरण कायम ठेवावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले आहे.


हेही वाचा :
पोलिसांच्या सल्ल्याने कोरटकरकडून डेटा डिलिट
औरंगजेबाचे महिमामंडन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

Related posts

32 burglaries solved : तीन चोरट्यांकडून ३२ घरफोड्या

Eknath shinde’s assistance: काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत

Rahul Gandhi visit: दहशतवादाविरुद्ध एकजूट असणे महत्त्वाचे