Eknath shinde’s assistance: काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत

Eknath shinde’s assistance

मुंबई : विशेष प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या २० वर्षांच्या स्थानिक युवकाचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली. (Eknath shinde’s assistance)

पहेलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते व सरहद संस्थेचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शुक्रवारी (२५ एप्रिल) सय्यदच्या कुटुंबीयांकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

सय्यद आदिल पहेलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचे काम करत असे. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहेलागमची सफर करत होता. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यदने एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. (Eknath shinde’s assistance)
पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बुधवारी (२३ एप्रिल)  रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. राज्यातील पर्यटकांची भेट घेऊन विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद आदिलने दाखवलेली माणुसकी आणि धाडसाबाबतचा अनुभव त्यांना सांगितला होता.

हेही वाचा :
दहशतवादाविरुद्ध एकजूट असणे महत्त्वाचे
आम्ही सरकारच्या पाठीशी, पण निर्णय तडीस न्या

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग