Chennai crime: डॉक्टरसह कुटुंबाने घेतला गळफास

Chennai crime

Chennai crime

चेन्नई : व्यवसायात मोठा फटका बसलेल्या डॉक्टरने आपल्या घरी आत्महत्या केली. डॉक्टरसह पत्नी आणि दोन मुले गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. गुरुवारी सकाळी अण्णा नगर पश्चिम येथे हा प्रकार उघडकीस आला.(Chennai crime)

डॉ. बालमुरुगन, त्यांची पत्नी सुमती आणि मुले दासवंत (१७) आणि लिंगेश (१५) अशी मृतांची नावे आहेत.

अण्णा नगरमध्ये डॉ. बालमुरुगन यांचा व्यवसाय होता. त्यात त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमती शहर न्यायालयात वकिली करत होत्या, तर दासवंत बारावीची परीक्षा देणार होता. लिंगेश दहावीत शिकत होता. (Chennai crime)

गुरुवारी सकाळी त्यांचा कार ड्रायव्हर त्यांच्या घरी आला. मात्र घरातून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी खिडकीतून डोकावले तर त्यांना चौघेही लटकलेल्या अवस्थेत आढळले. बालमुरुगन आणि सुमती एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांची मुले दुसऱ्या खोलीत मृतावस्थेत आढळली. (Chennai crime)

माहिती मिळताच, शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढले. विच्छेदनासाठी मृतदेह किलपॉक मेडिकल कॉलेज (केएमसी) रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :
शेजाऱ्याच्या  हल्ल्यात शास्त्रज्ञाचा मृत्यू
तमिळनाडूने बजेटमध्ये रूपयाचे चिन्ह वगळले

Related posts

PM Modi Warns

PM Modi Warns: हल्लेखोरांना सोडणार नाही

Firing on Tourist

Firing on Tourist : पर्वतांवरून उतरले आणि फायरिंग सुरू केले

Topate

Topate : काँग्रेसमध्ये निष्ठेचे फळ मिळाले नाही