गणेशोत्सवात संभाजीनगर तरुण मंडळ करणार मायमराठीचा गजर

Celebrating the glory of 'Maay Marathi' during Ganeshotsav

कोल्हापूर : प्रतिनिधी :  सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या  श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाकडून गणेशोत्सवात मायमराठीचा गजर होणार आहे. मंडळाच्यावतीने ‘ए आई मला मराठी शिकव ना’ हे अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अजित सासने यांनी दिली.  (Celebrating the glory of ‘Maay Marathi’ during Ganeshotsav)

‘ ए आई मला मराठी शिकव ना ’ पुस्तकाचे होणार प्रकाशन

‘ ए आई मला मराठी शिकव ना ’ हे अभियान म्हणजे नुसते भाषेच्या बाबतीत नाही तर  मराठी भाषेचा, संस्कृती, इतिहासचा प्रचार, प्रसार, प्रबोधन जतन संवर्धन व आईनेआपल्या मुलांच्यावर संस्कार करणे असा व्यापक उद्देश आहे. मुलांच्या जडणघडणीत मातृभाषेला अनन्य साधारण महत्व आहे. आधुनिकीकरण, इंग्रजी शाळांचे वाढते पेव अशा काळात आईकडून मुलाकडे येणारी मातृभाषा टिकणार आहे असा संदेश देणाऱ्या ‘ए आई मला मराठी शिकव ना’ या नावांनी मंडळातर्फे पुस्तकाची निर्मिती केली आहे. २१ सप्टेंबर २०२६ रोज पुस्तकाचे पहिल्या भागाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच या पुस्तकाचे मोफत वाटप कर्तुत्वान स्त्रीशक्ती व संभाजीनगर परिसरातील माता भगिनींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. . (Celebrating the glory of ‘Maay Marathi’ during Ganeshotsav)

मराठी भाषेसाठी अभियान राबवणार

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मात्र दुसरीकडे बंद पडत असलेल्या मराठी शाळांची संख्या पाहिली, तर त्याचा परिणाम फार मोठा समाजमनावर होणार आहे. मराठी भाषा, संस्कृतीला इतिहासाला तसेच सण वार उत्सव रिती रिवाज परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐतिहासिक वारसाला पुढील २५ वर्षात धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर मायमराठीचा जागर करण्यासाठी मंडळाने ‘ए आई मला मराठी शिकव ना’हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे.

मंडळाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव

श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाला ८० वर्षाची परंपरा आहे. मंडळाने प्रारंभापासूनच पर्यावरणपूरक व समाजप्रबोधनात्मक गणेशोत्सव साजरा करत आहे. मंडळाकडून  शाडू माती बनविलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्याकरिता नैसर्गिक रंगाचाच वापर केला जातो. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना राजमहालाची प्रतिकृतीमध्ये करण्यात येणार आहे.

दरवर्षी २१०० रोपांचे वाटप

मंडळ गेली २५ वर्षे कोणतीही वर्गणी मागत नाही. भाविकांनी दिलेल्या देणगीतूनच उत्सव साजरा करते. शिल्लक राहिलेल्या निधीतून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवते. मंडळाकडून साउंड सिस्टीमचा वापर न करता पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश आगमन व विसर्जन मिरवणुक काढली जाते. मंडळातर्फे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रतिवर्षी २१०० रोपांचे वाटप केले जाते.

दोन मंडळे एक झाली

श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळात काही मतभेद होऊन पंचवीस वर्षा पूर्वी दोन मंडळे तयार झाली ते म्हणजे श्री छत्रपती संभाजी नगर फुटबॉल क्लब या दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमजंतीतून मतभेद झाले होते पण मनभेद झाले नव्हते. सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या सुखदुःखात एकत्रपणे काम करत होते सामील होत होते. म्हणून दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून २५ वर्षानंतर दोन्ही मंडळांचे एकीकरण झाले. आणि यावर्षी एकच गणपती बसवायचा हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे यावर्षी उत्सवामध्ये उत्साह वाढला. . (Celebrating the glory of ‘Maay Marathi’ during Ganeshotsav)

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट : प्रताप सरनाईक