नवी दिल्ली : भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर तुफान गोळाबार सुरू असताना दुसरीकडे भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना बीएसएफने (बॉर्डर सेक्युरिटी फोर्स) यमदसनी पाठवले. सांबा जिल्ह्यात घुसखोरीचा डाव बीएसएफने उधळून लावला. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही चकमक झाली. (BSF)
भारत पाकिस्तान सीमारेषेवर गेली अनेक दिवस गोळीबार सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानमध्ये घुसुन दहशतवाद्याचे नऊ अड्डे उद्धवस्त केले. त्यामध्ये किमान १०० दहशतवादी ठार झाले आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. गुरुवारी रात्री पाकिस्ताने मिसाईल आणि ड्रोन भारतावर डागले. भारताने पाकिस्तानची मिसाईल आणि ड्रोन हवेतच नष्ट केली. जम्मू काश्मीर आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानने हल्ले केले होते. भारताने पाकिस्तानची तीन विमाने पाडली. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या लाहोर, कराची, इस्लामाबाद शहरावर क्षेत्रणास्त्रे डागून पाकिस्तानला धडा शिकवला. (BSF)
एकीकडे युद्धजन्य परिस्थित सुरू असताना पाकिस्तानने भारतात दहशतवादी घुसवण्याचा डाव आखला होता. गुरुवारी मध्यरात्री बीएसएफने किमान सात दहशतवादी ठार केले. जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला. त्यामध्ये किमान सात दहशतवादी ठार मारले. तसेच पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असे बीएसएफने म्हटले आहे. (BSF)