life-expectancy drops: पाच दशकांत पहिल्यांदाच भारतात आयुर्मानात घट

life-expectancy drops

नवी दिल्ली : भारतीय नागरिकांच्या आयुर्मानात पहिल्यांदाच घट दिसून आली आहे. गेल्या ५० वर्षांत ती पहिल्यांदाच कमी झाल्याचा अहवाल आहे. एका वर्षात ही घट ०.२ वर्षांनी कमी झाली आहे.(life-expectancy drops)

२०१६-२०२० च्या तुलनेत २०१७ ते २०२१ दरम्यान जन्माच्या वेळी आयुर्मान ६९.८ वर्षे असल्याचा अंदाज आहे. ग्रामीण आणि शहरी भागात याच कालावधीत आयुर्मान अनुक्रमे ०.१ वर्षे आणि ०.३ वर्षांनी कमी झाले आहे.

नमुना नोंदणी प्रणाली-आधारित संक्षिप्त जीवनमान सारण्या २०१७-२१ नुसार, ‘‘महिलांचे सरासरी आयुर्मान पुरुषांच्या आयुर्मानापेक्षा दोन वर्षांपेक्षा जास्त आहे.’’ (life-expectancy drops)

दिल्लीत पुरुषांसाठी सर्वाधिक ७३ वर्षे आयुर्मान आणि केरळमध्ये ७७.९ वर्षे नोंदवले गेले. पुरुषांसाठी सर्वांत कमी ६२.८ वर्षे आणि महिलांसाठी ६६.४ वर्षे नोंदवले गेले.

‘‘१९७०-७५ ते २०१७-२१ या कालावधीत ओडिशामध्ये पुरूषांच्या आयुर्मानात वार्षिक सरासरी वाढ सर्वाधिक तर हरियाणामध्ये किमान वाढ नोंदवली गेली आहे. महिलांसाठी, हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये सर्वाधिक आणि केरळमध्ये किमान वाढ नोंदवली गेली आहे,’’ असे अहवालात म्हटले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (RGI) यांनी हा अहवाल प्रकाशित केला आहे. शिवाय नागरी नोंदणी प्रणालीवर आधारित भारताचे महत्त्वपूर्ण सांख्यिकी (CRS) २०२१, नमुना नोंदणी प्रणाली (SRS) सांख्यिकी अहवाल २०२१ आणि मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणन (MCCD) २०२१ असे तीन अहवालही ७ मे रोजी प्रकाशित झाले आहेत. (life-expectancy drops)

सरकारी आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये महामारीच्या शिखरावर असताना भारतात मृत्यूंमध्ये जवळजवळ दोन दशलक्ष वाढ झाली होती. आयुर्मानातील ही घटही याच काळात दिसून आली आहे.

भारताच्या नागरी नोंदणी प्रणाली (CRS) २०२१ वर आधारित, २०२० मध्ये नोंदणीकृत मृत्यूंची संख्या ८.१ दशलक्ष वरून २०२१ मध्ये १०.२ दशलक्ष झाली.

पण सरकारने त्यांच्या अहवालात यापैकी जवळजवळ ०.६ दशलक्ष मृत्यू कोविड-१९ मुळे झाल्याचे म्हटले आहे.

या अहवालानुसार,  “२५-३४ वयोगटातील मृत्यू होण्यांमागे रक्ताभिसरण प्रणालीचे आजार आणि कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अनुक्रमे २१.२ टक्के आणि १५.६ टक्के आहे.”

तर ३५-४४ वयोगटात, याच दोन प्रमुख कारणांचा वाटा अनुक्रमे २५.९ टक्के आणि २०.३ टक्के आहे.

महाराष्ट्रातही सर्वाधिक मृत्यू
एकूण नोंदणीकृत मृत्यूंमध्ये २६ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, तेलंगणा, झारखंड आणि दिल्ली येथे २०२० ते २०२१ या काळात नोंद झालेल्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

(सौजन्य : डाउन टू अर्थ)

हेही वाचा :
बीएसएफकडून सात दहशतवादी यमसदनी
द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर