कोल्हापूर : प्रतिनिधी : खेळाडूंच्या भविष्यासाठी ब्रँड कोल्हापूर कडून मोठा निधी उभारण्याची घोषणा विधान परिषदेची काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यांनी स्वत: पाच लाखाची घोषणा करुन उपक्रमाचा शुभारंभ केला. या संकल्पनेला प्रतिसाद देताना नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांनीही एक लाख रुपयांची घोषणा करत प्रतिसाद दिला. (Brand Kolhapur)
नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जेष्ठ टेबल टेनिसपटू शैलजा भोसले यांना ‘ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या कला, क्रीडा, सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील ५२ गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. (Brand Kolhapur)
पॅरीस ऑलिंपिकमध्ये रौप्यदक विजेता स्वप्निल कुसाळे, साहित्यिक कृष्णात खोत, यूपीएससी परीक्षेतील गुणवंत बिरदेव डोणे, सौरभ पाटील, हेमराज पणोरेकर, दिलीपकुमार देसाई, अदिती चौगुले, शॉर्ट फिल्म राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सचिन सूर्यवंशी, मयूर कुलकर्णी, प्रशांत बिडकर, चित्रपट कला दिग्दर्शक दिलीप रोकडे, ऑपरेशन सिंदूरमधील राफेल विमानाचे पायलट झेवियर रेगे, लेफ्टनंट प्रियंका खोत, मिलिंद देसाई, यश मार्ले, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालिया, रक्तदाता विश्वजीत काशिद, फोटोग्राफर मंगेश देसाई, वेबसिरीज रायटर दिगंत पाटील, अर्णव कारेकर, क्रिकेटपटू अभिषेक निषाद, आंतरराष्ट्रीय नेमबाज राजकुंवर इंगळे, आयर्न मॅन चेतन चव्हाण, पंकज रावळू, माहेश्वरी सरनोबत, अभिनंदन चिंचवाडे, तनय सोहनी, राजवर्धन घाटगे, अमोल यादव, डॉ. विजय कुलकर्णी, दिलीप जाधव, गौरख माळी, सचिन बुरसे, स्वरुपा पुरजारी, विजय पाटील, आम्रपाली कोहली, सुषमा रेपे, डॉ. केतकी साखरपे, पराग वाटवे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रतिक पाटील, श्रीधर निगडे, अफ्रिद सत्तार, मानसिंग पाटील, पृथ्वीराज पाटील, कल्याणी पाटील, ऐश्वर्या पुरी, सृष्टी भोसले, अभिषेक निपाणे, अवंती माने यांचा ब्रँड पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
यावेळी बाळ पाटणकर, जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार, रविंद्र ओबेरॉय, डॉ.बी. एम. हिर्डेकर, अमरजा निंबाळकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, डॉ आर. एम. कुलकर्णी , रोटरीचे शीतल दुग्गे, निसर्गमित्रचे अनिल चौगले, पद्मा तिवले, अविनाश शिरगावकर, ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (Brand Kolhapur)