Blood donation: मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महायज्ञ

Blood donation

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी (२२ जुलै) राज्यातील पक्षाच्या सर्व मंडलांमध्ये महारक्तदानाचा उपक्रम राबवण्यात आला. पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील हजारावर मंडलांमध्ये एक लाखांहून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. (Blood donation)

रक्तदान करून मुख्यमंत्री  फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले होते. त्याला अनुसरून समाजाप्रती असलेल्या बांधिलकीच्या भावनेने प्रदेश भाजपातर्फे पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. (Blood donation)

रक्तदान हेच श्रेष्ठदान या सामाजिक जाणीवेतून ठिकठिकाणी वाढदिवसाचे औचित्य साधत झालेल्या शिबीरांमध्ये रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदानातून फडणवीस यांना वाढदिवसाचे अभीष्टचिंतन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांना रक्तदानाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक मंडलामध्ये किमान शंभर रक्तदानाचे लक्ष्य साध्य करत वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते सामाजिक कार्यात सहभागी झाले. (Blood donation)

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबीरावेळी ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, कृपाशंकर सिंह, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, ओमप्रकाश चौहान, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वरिष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, आमदार योगेश सागर यांच्यासह राज्य विधानमंडळाचे सदस्य व निमंत्रित उपस्थित होते.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर