टीईटी पेपरफुटीतील मुख्य सूत्रधाराचे बिहार कनेक्शन 

Bihar connection to the TET paper leak

जमीर काझी :  मुंबई :  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा( टीईटी) पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शन समोर आले असून मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता हा ‘ हाय प्रोफाईल ‘ व्यक्तीशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.या आंतरराज्यीय ‘सॉल्व्हर गँग’चे (पेपर सोडवून देणाऱ्या टोळीचे)  जाळे कार्यरत आहे मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी बिहार, हरियाणा, आग्रा आणि दिल्ली येथे छापे टाकले जात आहेत. (Bihar connection to the TET paper leak)

 ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) प्रश्नपत्रिकेसाठी दीड कोटी रुपयांचा व्यवहार होणार असल्याची  माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी  भिवंडीत राजीव साव, आकाश कुमार आणि धीरज सिंग यांना  अटक करून  टोळीचा पर्दाफाश केला. मोबाईल फोन, रोख रक्कम आणि  परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे चार संच जप्त केले होते. या पेपरफुटीमुळे रविवारची परीक्षा रद्द करण्यात आली. अटक केलेल्या  तिघांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत.

पोलिसांचे बिहारमधील समस्तीपूरमध्ये छापे

त्याच्याकडील चौकशीतून पेपरफुटीमागील कथित मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ताबद्दल माहिती मिळाली.  त्याला शोधण्यासाठी समस्तीपूर (बिहार) येथे छापे टाकत आहे. बालेश्वर साह यांचा मुलगा असलेला विजेंद्र गुप्ता हा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील विद्यापतीनगर  शेरपूर गावाचा रहिवासी आहे. . विजेंद्रचे इतर तीन भाऊ समस्तीपूरमधील स्थानिक ‘मऊ’ बाजारपेठेत छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  विजेंद्र २००३ नंतर उच्च शिक्षणासाठी बेगुसरायला गेला. तेथून अनेक वर्षांपासून गावी परतला नव्हता. (Bihar connection to the TET paper leak)

विजेंद्रची गुन्हेगारी पार्श्वभूमी

: पोलीस नोंदींवरून असे दिसून येते की, विजेंद्र गुप्ताची गुन्हेगारी पार्श्वभूमी जुनी आहे. २००३ मध्ये त्याचे नाव एका हाय प्रोफाइल हत्या प्रकरणाशी जोडले गेले होते. त्यानंतर तो विविध राज्यांमध्ये परीक्षांमध्ये फेरफार करणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य बनला. पेपर फुटीच्या बेकायदेशीर धंद्याबाबत तपास यंत्रणांच्या नोंदींमध्ये त्याचे नाव यापूर्वीच आले होते. बिहार शिक्षक भरती परीक्षा, ओडिशा स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) परीक्षा आणि NEET-UG यांसारख्या अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षांच्या पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये विजेंद्र गुप्ताचे नाव समोर आले आहे या प्रकरणांमध्ये त्याने मुख्य सूत्रधार म्हणून काम केले. त्याच्या सुनियोजित कार्यपद्धतीमुळे तपास यंत्रणाही थक्क झाल्या आहेत.

तपास अहवालानुसार, ओडिशा एसएससी पेपर फुटी प्रकरणात विजेंद्र गुप्ताला २८ जुलै २०२३ रोजी पहिल्यांदा  अटक करण्यात आली होती. त्या गंभीर प्रकरणात त्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला होता आणि तो बाहेर होता. त्यानंतर त्याचा सहभाग महाराष्ट्र टीईटी पेपरफुटीत असल्याचे समोर आले आहे. (Bihar connection to the TET paper leak)

आरोपींना मोकोका लावणार

 टीईटी पेपर फुटी प्रकरणी विरोधकांनी आज अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या विषयावर जोरदार चर्चा झाली .त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांवर मोकोका अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. (Bihar connection to the TET paper leak)

Related posts

तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो….

आमदार क्षीरसागरांनी मांडले वकिलांना संरक्षण देणारे महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक

राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; उद्धव ठाकरेंचे भाजपा विरुद्ध रणशिंग