जयपूर : खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत भक्ती वाडकरने जलतरणमध्ये एक रौप्य तीन कास्य पदक पटकावत पदकांचा चौकार ठोकला. संस्कृती पाटीलने ज्युदोमध्ये ब्राँझ पदकाची कमाई केली.खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पुणे, शिवाजी विद्यापीठीच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या यशात महाराष्ट्राची मुलींनी पदकाची बाजी मारली आहे. (Bhakti Wadkar)
जलतरणमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कडून खेळताना कोल्हापूरच्या भक्ती वाडकरनेही १ रौप्य तीन ब्राँझ पदके पटकावले. तिचे वडिल राहूल वाडकर हे कोल्हापूरमधील राधानगरी शासकीय धान्य गोदाम या हमालाची नोकरी करतात. भक्तीने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रूपेरी यश संपादन केल्यानंतर २०० मीटर बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाईल व मिडले रिले शर्यतीत ब्राँझ पदकाची कमाई केली. शासनाच्या पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी ती सराव करते. गतवेळच्या आसामधील स्पर्धेत तिने एक सुवर्ण, ३ रौप्य आणि एक ब्राँझ अशी पाच पदकाची कमाई केली होती. (Bhakti Wadkar)
शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृती पाटीलने ज्युदोतील महिलांच्या ७८ किलो वजनी गटात ब्राँझ पदकाची कमाई केली आहे. सलग दोन लढतीत गुजरात, पंजाबच्या खेळाडूंना पराभव करीत उपांत्य फेरीत मजल मारली होती. ब्राँझ पदकाच्या लढतीत चंदिगडच्या अनूला पराभूत करीत संस्कृतीने पर्दापणातच पदकाचा करिश्मा घडविला. कोल्हापूरतील पन्हाळा तधील कोतोली गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील यांची संस्कृती ही कन्या असून तिचे आजोबा मारुती पाटील व चुलते अरूण पाटील कुस्तीगीर होते. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत ती सराव करते. (Bhakti Wadkar)