नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी नवी दिल्लीतील हरियाणा भवनात मुस्लीम मौलवी, मुस्लीम विचारवंतासमवेत महत्वाची बैठक घेतली. हिंदू मुस्लीम कधी एकत्र राहू शकत नाही ही धारणा बदलली पाहिजे. आपण सर्वजण भारतीय आहोत ही ओळख बनवली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. बैटकीला एआयईओचे अध्यक्ष डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी, संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णा गोपाल, अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल, मुस्लीम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार उपस्थित होते. (Bhagvat)
एकीकडे दिल्लीत संसदेत पावसाळी अधिवेशनात गोंधळ सुरू असताना दुसरीकडे आरएसएसचे भागवत यांनी हरियाणा भवनात मुस्लीम इमाम, मौलवीसोबत साडेतीन तास बैठक घेतली. त्यामध्ये ६० मौलवी सहभागी झाले होते.
बंद सभागृहात झालेल्या बैठकीत ज्वलंत प्रश्नांवर खुली चर्चा झाली. भारताला विश्व गुरु बनवायचे असेल तर हिंदू मुस्लीमांतील दरी कमी झाली पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच अशा बैठका सातत्याने झाल्या पाहिजेत असे मत अनेकांनी व्यक्त केले.
बैठकीत सहभागी झालेल्या इमामांनी अशी माहिती दिली की मंदिर आणि मशिदीतील दुरावा कधी कमी होणार? गुरुकुल आणि मदरसा मध्ये कधी संवाद वाढणार यावर चर्चा झाली. हिंदू मुस्लीमातील संवाद प्रक्रिया देशभर खालच्या पातळीपर्यंत पोचली पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले. हिंदू मुस्लीम कधीच एकत्र राहू शकत नाही ही धारणा बदलली पाहिजे. हिंदू मुस्लीमांपेक्षा एकच भारतीय ही ओळख निर्माण झाली पाहिजे अशी मते व्यक्त करण्यात आली. (Bhagvat)
बैठकीमध्ये आम्ही विदेशी नाही तर भारतीय आहोत. आक्रमकांच्या पिढ्या समाप्त झाल्या आहेत. आता या विचारातून आपण बाहेर पडून सर्वजण भारताची मुले आहोत ही भावना निर्माण झाली पाहिजे. तरच भारत मजबूत होईल आणि विश्वगुरू होईल असे मत व्यक्त करण्यात आले.
संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. मुस्लीम समाजासोबत मोहन भागवत यांची संवादाची ही प्रक्रिया नवीन नसून यापूर्वी २०१६ आणि २०२२ मध्ये मुस्लीम बुद्धीजीवीसमवेत हरियाणा भवनातच बैठक झाली होती. (Bhagvat)