‌Beed Blast : बीडच्या धार्मिक स्थळामध्ये स्फोट

Beed Blast

Beed Blast

अर्धमसला : बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावामध्ये आज रविवारी पहाटे एका धार्मिक स्थळामध्ये जिलेटिनच्या कांड्यांचा सौम्य स्फोट झाला. या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी धार्मिक स्थळाच्या इमारतीला भेगा पडल्या असून फरसबंदीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली. (‌Beed Blast)

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी पहाटे चार वाजता गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावामधील या धार्मिक स्थळामध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अल्पसंख्याक समुदायातील लोकांनी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करून या प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी, अशी मागणी केली. या स्फोटामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याचप्रमाणे, आरोपींनी या स्फोटाकरिता स्फोटके कशी जमवली, याचाही तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. विजय रामा गव्हाणे (वय २२) आणि श्रीराम अशोक सादगे (वय २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही संशयित गेवराई तालुक्याचेच रहिवासी आहेत. (‌Beed Blast)

स्फोटानंतर बीड पोलिसांची तुकडी, बॉम्बशोधक पथक व न्यायवैद्यक तज्ज्ञांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संभाजी नगर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनीही घटनास्थळाला भेट दिली. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कनवट हे सकाळपासून घटनास्थळी होते. “या गावाच्या सरपंचांनी पहाटे आम्हाला फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर, २० मिनिटांमध्येच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सकाळी ६ पर्यंत आम्ही संशयितांना ताब्यात घेतले होते. तक्रारीच्या आधारे संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे,” अशी माहिती कनवट यांनी दिली. (‌Beed Blast)

बॉम्बशोधक पथकाने आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून नमुने जमा केले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी गावातील रहिवाशांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. (‌Beed Blast)

हेही वाचा :

 मुख्यमंत्री फडणवीस आता  राजधर्म पाळणार का?

कोरटकरची कळंबा कारागृहात रवानगी

Related posts

JD Vance Visit

JD Vance Visit: ट्रम्प यांचा वर्षअखेरीस भारत दौरा

Athani murder

Athani murder : खून डोंगरावर, क्लू जयसिंगपूरमध्ये, आरोपी अथणीत

Team Khandoba

Team Khandoba: ‘खंडोबा’ उपांत्य फेरीत, ‘सम्राटनगर’ पराभूत