बारामती,राहुरीची  पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता 

Baramati, Rahuri Bypolls Likely to be Uncontested

जमीर काझी :  मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. याठिकाणी २३ एप्रिलला मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान बारामती व राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी राज्यातील विधानसभा निवडणुकीबरोबर राज्यातील दोन पोटनिवडणूकीचे वेळापत्रक जाहीर केले.बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राहुरीतून भाजपाकडून कार्डीले यांच्या कुटूंबियात उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. पोटनिवडणुका बिनविरोध कारण्याच्या प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. (Baramati, Rahuri Bypolls Likely to be Uncontested)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद स्वीकारले आहे. त्यामुळे त्या बारामतीची पोटनिवडणूक लढविणार हे निश्चित आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले आहे. महायुतीच्या उमेदवार या सुनेत्रा पवार असणार असल्याने या ठिकाणची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Baramati, Rahuri Bypolls Likely to be Uncontested)

  राहुरीतील भाजपाचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेली निवडणूक बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार आहे. याठिकाणी कर्डीले यांच्या कुटूंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी शरद पवार गटाचे  माजी मंत्री रविंद्र तनपुरे हे ही इच्छुक आहेत. उमेदवारी मिळण्याची हमी मिळाल्यास  ते भाजपात प्रवेश करण्याची त्यांची तयारी आहे, अशी  चर्चा आहे 

 अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असणारे माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले (वय ६६ ) यांचा आजारपणामुळे निधन झाले. कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजपा असा राजकीय प्रवास केला. कर्डिले हे २००९ मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. (Baramati, Rahuri Bypolls Likely to be Uncontested)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर