कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला 

Attack on Abhijit Dipke of the Cockroach Party

जमीर काझी : मुंबई :  कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सोमवारी जयपुर येथे मारहाण करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुकारलेल्या आंदोलनावेळी दोन तरुणांनी त्यांना कानशिलात लगावल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पक्षाच्या समर्थकांनी  दोघा हल्लेखोराना पकडून  चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. ते भाजपा समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. (Attack on Abhijit Dipke of the Cockroach Party)

अभिजीत दिपके हे नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांशी संबंधित इतर समस्यांविरुद्धच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक शहीद स्मारकावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.  सहभागी  तरुण ‘मी माझ्या देशावर प्रेम करतो, मी भ्रष्टाचार नाकारतो’ आणि ‘पेपरफुटी थांबवा’ यांसारख्या घोषणा असलेले फलक आणि तिरंगा घेऊन आले होते. काही महिला आपल्या लहान मुलांसोबत आंदोलनात सामील झाल्या. कार्यकर्त्यांनी शहीद स्मारकाच्या प्रवेशद्वारावर कॉकरोच चित्र काढले आणि “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!” अशी घोषणा लिहिली होती. (Attack on Abhijit Dipke of the Cockroach Party)

आंदोलनास्थळी कार्यकर्त अभिजीत दिपके यांना खांद्यावर उचलून घेऊन जात असताना  शहीद स्मारकाजवळ पोहोचताच तरुणांमध्ये झटापट झाली.  दोघे तरुण दिपके यांच्याजवळ आले त्यांना शिवीगाळ करीत कानशिलात लगावली .अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आंदोलन स्थळी मोठा गोंधळ उडाला. घोषणाबाजी सुरू झाली. हल्लेखोरांना जमावाने घटनास्थळी पकडून चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी झालेल्या गोंधळामुळे  मोठी पळापळ झाली. त्यामध्ये अनेकांचे मोबाईल चोरीला गेले. फोनही चोरीला गेले. यानंतर, व्यासपीठावरून आपले मोबाईल फोन आणि सामान सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

ज्या तरुणाने थप्पड मारली तो म्हणाला, “हे लोक जिहादी मानसिकतेचे आहेत. अभिजीत दीपके देशाची दिशाभूल करत आहे. ही पेपरफुटी केवळ एक निमित्त आहे.” (Attack on Abhijit Dipke of the Cockroach Party)

२० जूनला पुन्हा दिल्लीत मोर्चा

कानशिलात मारण्याच्या घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी आंदोलकांना संबोधित केले. त्यांनी घोषणा दिली, हिंदू-मुस्लिम राजकारण चालणार नाही, चालणार नाही. आपण हे स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळवले आहे. आपण हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभागलेले आहोत. आपण जात आणि धर्माने विभागलेले आहोत, पण आपण यात अडकून पडता कामा नये. आम्ही २० जून रोजी पुन्हा दिल्लीवर मोर्चा काढू. यावेळी, जेव्हा आम्ही दिल्लीला जाऊ, तेव्हा राजीनामा दिल्याशिवाय परत येणार नाही. त्यांनी “दिल्ली चलो!” अशी घोषणाही दिली. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.

दिपकेच्या घराजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त

जयपुर मधील हल्ल्याच्या घटनेनंतर अभिजीत तितके याच्या छत्रपती संभाजी नगर येथील निवासस्थान बाहेरील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. (Attack on Abhijit Dipke of the Cockroach Party)

Related posts

मोहन भागवतांना पाकिस्तानी म्हणणार का? : संजय राऊत

एसटीच्या हंगामी भाडेवाढीस एक महिन्याची मुदतवाढ

वाढीव वीजबिले, स्मार्ट मीटर प्रकल्प स्थगित करा : जयंत पाटील