ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव

मुंबई, विशेष प्रतिनिधी : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.७) माध्यमांशी बोलताना केला. (Ajit Pawar)

तीन दिवसाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. नवनिर्वाचित सदस्यांना शपथविधी हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात येत आहे. यावेळी सभागृहात जाताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम केले आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.

लोकसभेला ईव्हीएमने ३१ जागा महाविकास आघाडीला दिल्या. त्यावेळी ईव्हीएम मशीन खूप चांगली होती. मात्र, विधानसभेत महायुतीच्या बाजुने जनतेने कौल दिला तर, ईव्हीएमला दोष द्यायला मविआने सुरुवात केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना शपथ घेण्याचा उद्याचा (दि.८) दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तरच त्यांना सोमवारी (दि.९) कामकाजात सहभागी होता येणार आहे. याबाबतची माहिती सर्वांना आहे. परंतु, पहिल्याच दिवशी आम्ही संख्येने कमी असलो तरी आम्ही काही वेगळ करतोय. त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रकार सुरू आहे, असा टोलाही त्यांनी केला. (Ajit Pawar)

सुरुवातीला महाविकास आघाडीचे आमदार शपथविधीसाठी सभागृहात बसले होते. मात्र, काही वेळाने ते सर्व बाहेर निघून गेले. इतकी वर्षे मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा मी चांगला होतो. मी कुणासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले नाही ते सांगा. अशी विचारणा करत मी जर दोषी असतो किंवा भ्रष्टाचारी असतो. तर त्यांनी मला उपमुख्यमंत्री केलेच नसते. मात्र, सध्या ते राजकीय भूमिकेतून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू, मी योग्यठिकाणी न्याय मागत होतो आणि तो मला मिळाला आहे असेही अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांला उत्तर देताना स्पष्ट केले.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ