ADR Report: २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा खर्च सर्वाधिक १४९४ कोटी

ADR Report

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०२४ च्या निवडणुकांतील खर्चाचा आकडा सुमारे १,४९४ कोटी रुपये आहे. ही रक्कम एकूण निवडणूक खर्चाच्या ४४.५६ टक्के आहे. असे पीटीआय या वृत्तसंस्थेने शुक्रवारी मतदान हक्काविषयी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या हवाल्याने वृत्त दिले. (ADR Report)

एडीआरने म्हटले आहे की, ज्या ३२ राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या आर्थिक नोंदींचे विश्लेषण केले गेले त्यात काँग्रेसने ६२० कोटी रुपये म्हणजेच एकूण १८.५ टक्के खर्च केले.

१६ मार्च ते ६ जून २०२४ दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुका आणि आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीममधील एकाच वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या राजकीय पक्षांनी एकत्रितपणे ३,३५२.८१ कोटी रुपये खर्च केले. यापैकी, केवळ राष्ट्रीय पक्षांनी २,२०४ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला. तो एकूण खर्चाच्या ६५.७५ टक्के आहे. (ADR Report)

‘‘जमा झालेल्या एकूण निधीपैकी, राष्ट्रीय पक्षांचा निधी ६,९३०.२४६ कोटी रुपये (९३.०८ टक्के) आहे तर प्रादेशिक पक्षांचा मिळालेला निधी ५१५.३२ कोटी रुपये (६.९२ टक्के) आहे,’’ असे अहवालात म्हटले आहे.

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या ९० दिवसांच्या आत आणि राज्य निवडणुकीच्या ७५ दिवसांच्या आत निवडणूक आयोगाला (EC) सादर करावे लागणाऱ्या अनिवार्य खर्चाच्या विवरणपत्रांवर हे विश्लेषण आधारित आहे. तथापि, एडीआरने हे विवरणपत्र सादर करण्यात लक्षणीय विलंब झाल्याचे नोंदवले.

आम आदमी पक्षाने (आप) आपला अहवाल १६८ दिवस उशिरा सादर केला, तर भाजपने राज्यानुसार १३९ ते १५४ दिवस उशिरा सादर केला. फक्त काँग्रेसने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा एकत्रित खर्च अहवाल सादर केला. (ADR Report) एकूण खर्चापैकी सर्वांत जास्त खर्च प्रचारावर झाल्याचे यातून दिसून आले. राजकीय पक्षांनी प्रचार आणि प्रचारात्मक उपक्रमांवर एकूण २,००८ कोटी रुपये खर्च केले. ही रक्कम त्यांनी घोषित केलेल्या एकूण खर्चाच्या ५३ टक्क्यांहून अधिक आहे.

हेही वाचा :
कारागृह घोटाळा प्रकरणांवर फडणवीसांकडून पांघरुण : राजू शेट्टी
 …म्हणून ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारले : मोदी

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर