अभिषेक शर्माचे तांडव; ३८ चेंडूत ११३ धावा

Abhishek Sharma's explosive century

कोल्हापूर : प्रतिनिधी : भारताने यजमान न्यूझीलंडचा सहा गड्यांनी दणदणीत पराभव करत टी-२० मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली. भारताचा सलामीवीर अभिषेकचे तांडव मैदानावर पहायला मिळाले. त्याने किवी गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत ३८ चेंडूत ११३ धावा चोपल्या. त्याचा साथीदार वैभव सूर्यवंशीने ४५ धावा कुटल्या. न्यूझीलंडची १९८ धावासंख्या भारताने १३.२ षटकात ४ गडी गमावून सहज पार केली. (Abhishek Sharma’s explosive century)

वेलिंग्टन झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने २० षटकात ३ गडी गमावून १९८ धावासंख्या उभारली. डॅरिल मिचेलने तडाखेबंद फलंदाजी करत ८९ धावा केल्या. फिन अलेनने ४० तर वेबॉन जेकब्जने ३९ धावा केल्या. अर्शदीपसिंग, अक्षर पटेल आणि निलेश कुमार रेड्डीने प्रत्येकी एक गडी बाद केला. (Abhishek Sharma’s explosive century)

न्यूझीलंडचे आव्हान पार करण्यासाठी भारताची सलामीची जोडी अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात उतरली. दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजी सीमापार भिरकावली. वैभव सूर्यवंशीने १९ चेंडूत ४५ धावा चोपल्या. त्याने प्रत्येकी चार षटकार आणि चौकार मारले. अभिषेक शर्माचा जलवा दुसऱ्या बाजूला सुरू होता. अभिषेकने ९ चौकार आणि ११ षटकार खेचत ११३ धावा केल्या. संजू सॅमनने १३ धावात १८ धावा केल्या. कायल जॅमिसनने २ गडी बाद केले. मिचेल सँटनर आणि मॅथ्यू फिशरने प्रत्येकी एक गडी बाद केला. (Abhishek Sharma’s explosive century)

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट : प्रताप सरनाईक