Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालचे घुमजाव

Yashasvi Jaiswal

मुंबई : भारताचा कसोटी फलंदाज यशस्वी जैस्वालने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासंदर्भात घुमजाव केले आहे. आगामी देशांतर्गत मोसमामध्ये पुन्हा मुंबई संघाकडून खेळण्याची विनंती करणारे पत्र यशस्वीने मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) लिहिले आहे. मागील महिन्यातच यशस्वीने मुंबई संघाला सोडचिठ्ठी देत गोवा संघामध्ये प्रवेश केला होता. (Yashasvi Jaiswal)

गोवा संघाकडे जाण्यासाठी एमसीएने मागील महिन्यात यशस्वीला ना-हरकत प्रमाणपत्रही दिले होते. कुटुंबासहीत गोव्याला स्थायिक होण्याचे यशस्वीचे नियोजन होते. मात्र, आता त्याचे नियोजन बदलले असून तो पुन्हा मुंबईकडून खेळू इच्छितो. एमसीएचे सचिव अभय हडप यांनी यशस्वीचे पत्र मिळाल्याची पुष्टी केली. आम्ही याबाबत निर्णय घेण्याची घाई करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. एमसीएने दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सादर केले नसल्याचेही यशस्वीने पत्रात म्हटल्याचे हडप यांनी नमूद केले. या महिन्यात होणाऱ्या एमसीएच्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात येईल. (Yashasvi Jaiswal)

पंचवीस वर्षीय यशस्वीने आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीची सुरुवात मुंबई संघाकडूनच केली होती. २०१९ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी तो रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईतर्फे छत्तीसगडविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत ३६ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ६०.८५ च्या सरासरीने ३,७१२ धावा केल्या असून त्यामध्ये १३ शतके व १२ अर्धशतकांचा समावेश आहे. (Yashasvi Jaiswal)

हेही वाचा :
आयपीएल एक आठवडा स्थगित
उन्नती, आयुषची उपांत्य फेरीत धडक

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !