Operation Sindoor update : पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर

Vyomika Sing

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर केला असल्याचा आरोप भारताने केला.

भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची गुप्त माहिती गोळा करण्यासाठी ३००-४०० ड्रोन सोडण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (९ मे) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले. (Operation Sindoor update)

८ ते ९ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने केलेल्या चिथावणीखोर उल्लंघनांची माहिती देताना, सिंग म्हणाल्या, पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण पश्चिम सीमेवर भारतीय हवाई हद्दीचे अनेक वेळा उल्लंघन केले. त्यामागे लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचा उद्देश होता.

‘‘पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर जड कॅलिबर शस्त्रांचा वापर केला. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर, लेह ते सर क्रीक पर्यंत ३६ ठिकाणी अंदाजे ३००-४०० ड्रोनसह ड्रोन घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला,’’ असे त्या म्हणाल्या. (Operation Sindoor update)

भारतीय सशस्त्र दलांनी गतिज आणि नॉन-गतिज पद्धतींचा वापर करून यापैकी अनेक ड्रोन पाडले, असे सांगून, विंग कमांडर सिंग सांगितले की, या मोठ्या प्रमाणात हवाई घुसखोरीचा संभाव्य उद्देश एडी सिस्टमची चाचणी करणे आणि भारतीय बाजूची गुप्त माहिती गोळा करणे हा होता.

ड्रोनच्या ढिगाऱ्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचे सांगून, त्या म्हणाल्या की, प्राथमिक अहवालांवरून असे दिसून येते की ते तुर्की असिसगार्ड सोंगर ड्रोन आहेत.  ते कमी उंचीचे, क्वाड्रॉटर, मानवरहित लढाऊ हवाई वाहन (UAEV) आहेत.

पाकिस्तानी सैन्याने पंजाबमधील भटिंडा लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ‘‘रात्री पाकिस्तानच्या एका सशस्त्र यूएव्हीने भटिंडा लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो शोधून निष्क्रिय करण्यात आला,’’ असे त्या म्हणाल्या.

भारताने तत्काळ प्रत्युत्तर पाकिस्तानमधील चार हवाई संरक्षण स्थळांवर सशस्त्र ड्रोन सोडले. त्यामुळे पाकिस्तानचा एक एडी रडार नष्ट झाला. (Operation Sindoor update)

भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत या परिषदेत उपस्थित असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील तंगधार, उरी, पूंछ, मेंढर, राजौरी, अखनूर आणि उधमपूर भागात नियंत्रण रेषेवर जड कॅलिबर तोफखाना आणि ड्रोनचा वापर करून तोफांचा मारा केला. त्यामुळे भारतीय लष्कराच्या जवानांना काही नुकसान आणि दुखापत झाली.” भारतीय लष्कराने तेवढेच जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :
पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद
 द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना