दक्षिणमधील उपनगरांच्या समस्या सोडविणार : अमल महाडिक

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उपनगरांमधील भागातील नागरिक येथील खराब रस्ते, पाणीप्रश्न व कचऱ्याच्या समस्येने हैराण झाले आहेत. या सर्व समस्यांकडे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भागातील नागरिक त्रस्त आहेत. या सर्व समस्यांह अन्य समस्या कायमस्वरूपी  निकालात काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे आश्वासन कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी दिले.

सुर्वेनगर व जिवबा नाना पार्क येथील मतदारांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

अमल महाडिक म्हणाले, या भागातील रस्त्यांची अवस्था बदलून त्यांचा कायापालट करणार आहे. उपनगरांत मूलभूत सुविधांसह काही विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी आराखडा करणार आहे. पायाभूत सुविधांसह नागरिकांचे जीवनमान सुधारावे हे ध्येय सुरुवातीपासूनच ठेवले आहे.

यावेळी उमेश हळदकर, सचिन साळोखे, अजित खोत, राजू डोईफोडे, प्रथमेश कांदळकर, जलील नाकाडे, ऋषभ पवार, प्रतिक पाटील, अमित चरणकर, मनिषा निंबाळकर, उमा कदम, जया पाडे, सुषमा माळवदे, स्मिता पोवार, सौ. देसाई, सौ. सुतार, निखिल पजइ, अर्केश जाधव, विनायक तेली, एन. आर. पाटील, इम्रान बेळगावकर, गाणी मुजावर, वर्षा तेली, जाधव वाहिनी, मनिषा पारकर, अंजना पाटील, आयेशा मुल्ला, सचिन रानगे, दिलीप हळदकर, काशिदकर, लक्ष्मी रानगे, पूनम जाधव, सुषमा हळदकर, अश्विनी हळदकर, मनिषा जाधव, सारिका घोरपडे, रंजना बाबर, सुनीता सुर्वे, राणाप्रताप सासणे, मारुती कलविकटे, बकरे, मनोहर देसाई, सचिन खटावकर, रोहन सुळगावकर, योगेश चरणकर,  राजू वडगावकर, राहुल खटावकर, स्वप्नाली वाडकर,  मंगल चौगुले यांच्यासह भागातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी