जमीर काझी; मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीच्या परभणी दौऱ्यावर टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणी व बीड मधील घटनेची गृहमंत्री म्हणून केव्हा जबाबदारी घेणार , ते कधी घटनास्थळी भेट देणार आहेत ?, असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी मंगळवारी (दि.२४) पत्रकारांशी बोलताना केला. (Sanjay Raut)
छगन भुजबळांना दूर करू शकता, पण खुनाचा संशय असलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान कसे दिले? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
राहुल गांधी यांनी सोमवारी (दि.२३) परभणी न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी हे जाती-जातीत वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांचे तेवढेच काम आहे अशी टीका केली होती. त्याबाबत राहूल यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, विरोधी पक्षाने, जनतेने, नागरिकांनी काय करावे, कुठे जावं, काय खावं, कोणत्या भूमिका मांडाव्यात हे नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस ठरवणार आहेत का? या देशात लोकशाही आहे का ? महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीसांनी समजून घ्यावे. गृहमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारत त्या ठिकाणी भेट द्यावी आणि मुख्य आरोपींना तातडीने अटक करावे, असे आवाहन करून ते म्हणाले की,’ परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या आहेत. त्या राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या आहेत. (Sanjay Raut)
त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे असे लोकं आपल्या मंत्रिमंडळात आहेत. छगन भुजबळांसारख्या नेत्याला दूर ठेवू शकता, पण खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसे मिळतं ? असा सवाल करीण मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला.
न्यायाच्या, द्वेषाच्या गोष्टी करणारे फडवणीस गृहमंत्री म्हणून बीडला गेले का ? राहुल गांधी बीडला गेले किंवा परभणीत गेले, यामुळे तुमचं पित्त का खवळलं ? असा सवाल राऊतांनी फडणवीसांना केला. राहुल गांधी हे लकोसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय संविधानाने त्यांन जो संसदेत आहे, तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे. तो दर्जा त्यांना नरेंद्र मोदी, अमित शाह किंव फडणवीसांनी दिलेला नाही. जेव्हा तुमच्या हातात होतो, तेव्हा तुम्ही त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू दिले नाहीत, आता लोकसभेतल्या आकडेवारीनुसार त्यांना हे पद मिळालंय. मोदींना तिथे बहुमत नाहीये हे मान्य करा, ते कुबड्यांवर आहेत, अशी टीकाही राऊतांनी केली. (Sanjay Raut)
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी. राहुल गांधी त्यांना भेटायला गेले यावर बोलण्यापेक्षा, ज्यांनी या हत्या घडवल्या त्यांच्यावर बोला. हा महाराष्ट्र मानवतेसाठी, माणूसकीसाठी ओळखला जात होता. गेल्या पाच वर्षांमध्ये या राज्यामध्ये माणूसकीचा खून झाले आहेत. (Sanjay Raut)
ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, अशा व्यक्ती फडणवीसांच्या मंत्रीमंडळात आहेत. तुम्ही छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळातून दूर करू शकता, पण एका खुनाचा , कटकारस्थानाच संशय ज्याच्यावर आहे, अशा व्यक्तीला तुम्ही मंत्रीमंडळापासून दूर ठेवत नाही ? कारण तुमचं जातीचं राजकारण आहे. तुम्ही एक समाज वापरून घेताय, अशी टीका राऊतांनी फडणवीसांवर केली. काही आमदारांचा विरोध आहे म्हणून भुजबळांना दूर ठेवता, पण जिथे बीडसह महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेचा विरोध आहे. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या कारस्थानात ज्यांचा संशयास्पद हात आहे, अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रीमंडळात नको, अशा घोषणा अजित पवार यांच्यासमोर देण्यात आल्या. खऱ्या आरोपींना पकडण्याची हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का ? असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला.
हेही वाचा :