कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याच निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून याच स्वागत करण्यात आले आहे. राज्यात नाहीतर देशात लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात घेण्यात आल्या होत्या आणि आज अचानकपणे एका टप्प्यात निवडणूक जाहीर करण्यात आली. यादरम्यान सरकारला बराच वेळ मिळाला आणि राज्याची तिजोरी खाली असताना देखील सरकारने मनाला येईल तशा योजना जाहीर केल्या आहेत. यापुढे सरकार आता नवीन काही योजना जाहीर होणार नाहीत राज्यात एका टप्प्यात निवडणुका घेण्यात येत आहेत. आणि आम्ही एकाच टप्प्यात महायुतीचा कार्यक्रम करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. ते आज इचलकरंजी येथे पत्रकारांशी बोलत होते. (Jayant Patil)
एक संघपणे या निवडणूकीला एकत्र सामोरे जाऊ
गेल्या पाच वर्षात राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर अखेर निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. महाविकास आघाडीसह महायुतीकडे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे येत्या काळात वेगवान घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत. दरम्यान निवडणूकांनाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एक संघपणे या निवडणूकीला एकत्र सामोरे जाऊ. हे सरकार घाबरलेले आहे. म्हणून योजना जाहीर करून मतदार खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे जनतेला कळाले आहे. यामुळे आमचा विजय होईल असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
मतदार महायुतीला त्यांची जागा दाखवून देईल
लाडकी बहीण योजनेवरून देखील त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत लाडकी बहीण योजना त्यांना परमनंट करायची असती तर त्यांनी लेखाशिष्य केले असते. मात्र त्यांनी ते केले नाही, आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना यापेक्षा अधिक देऊ. सोबतच राज्यातील बहिणींच्या केसाला धक्का देखील लागणार नाही. अशी सुरक्षा महाविकास आघाडी सरकार देईल. आज निवडणुका घोषित झाल्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जनता निवडणुकीची वाट बघत होती आणि निवडणुकीची वाट बघणारा मतदार महायुतीला त्यांची जागा दाखवून देईल असे जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil)
गुरूवारी जागा वाटपावर शिक्कमोर्तब करू
महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही कधीच मनाने एकत्र आले नाही, डोक्यावर टांगती तलवार ठेवून, दम देऊन पक्ष फोडण्याच काम भाजपने केल आहे. त्यामुळे ते मनाने एकत्र कधीचं येऊ शकत नाही. सध्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही घोळ नाही. जवळपास 218 जागा निश्चित झाल्या आहेत, 60 ते 70 जागांचे निर्णय झाल्यासारखे आहेत. त्यावर शिक्कामोर्तब करायचे आहे, गुरूवारी सकाळी बसून आम्ही ते करू, मुख्यमंत्री पदासंदर्भात महाविकास आघाडीत साधक- बाधक चर्चा झाली आहे, वेळ आल्यानंतर ते आम्ही जाहीर करू असंही आमदार जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा :