VP Election Voting : राधाकृष्णन की सुदर्शन रेड्डी?

VP Election Voting

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (९ सप्टेबर) मतदान सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल आणि किरण रिजिजू यांच्यासह राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, भाजप खासदार कंगना राणौत आणि सपा नेते राम गोपाल यादव आदींनी मतदान केले. (VP Election Voting)

एनडीएने सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे, तर विरोधी पक्षाने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. मतदान प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू झाली ती  संध्याकाळी ५ पर्यंत सुरू राहील. दुपारी ३ वाजेपर्यंत ९६% खासदारांनी मतदान केले.

संसद भवनातील वसुधा, कक्ष क्रमांक एफ-१०१ येथे मतदान सुरू आहे.

बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल मतदानापासून दूर राहणार

बिजू जनता दल (बीजेडी), भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) सारख्या प्रादेशिक पक्षांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक समस्यांना आमचे प्राधान्य राहणार आहे. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील आघाडीपासून स्वतःला दूर ठेवून त्यांच्या संबंधित राज्यांसाठी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी निवडणुकीचा वापर केल्याचे दिसते. (VP Election Voting)

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीपासून ‘समान अंतर राखण्याच्या’ त्यांच्या धोरणाचा भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचे बीजेडीचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव म्हणाले. पंजाबमधील पुराच्या पार्श्वभूमीवर अकाली दल निवडणुकीवर बहिष्कार टाकेल असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. माजी लोकसभा खासदार आणि झारखंडचे माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना २००४ ते २००७ या काळात तामिळनाडू भाजप अध्यक्ष असताना “दक्षिणेत पक्षाचा पाया रचण्याचे” श्रेय दिले जाते. दुसरीकडे, विरोधी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. २०११ मध्ये निवृत्त झालेले न्यायमूर्ती रेड्डी हे या पदासाठी निवडणूक लढवणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ होता. (VP Election Voting)

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधीही मतदान केले.

जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. (VP Election Voting)

मतदान केल्यानंतर ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये मोदींनी “२०२५ च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान केले,” असे म्हटले आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर