Vivekananda College  : टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय प्रथम

???????

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग साळोखेनगर  यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झोनल पुरुष टेबल टेनिस स्पर्धेमध्ये कोल्हापुरच्या विवेकानंद महाविद्यालयाने अंतिम सामन्यात के.आय.टी. कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, वर मात करून प्रथम क्रमांक पटकावला. संघाची  इंटरझोनल टेबल टेनिस स्पर्धेकरिता निवड झाली. (Vivekananda College)

    महाविद्याच्या संघातील  अनिष  सोनटक्के, भव्य शाह,  आदर्श पाटील, ऋषिकेश नलवडे, समर्थ चव्हाण या खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत विवेकानंद महाविद्यालयाला विजेतेपद पटकावून दिले.  या खेळाडूंचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे  यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे  प्राचार्य  डॉ. आर. आर. कुंभार, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे,  प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व सुरेश चरापले यांचे खेळाडूंना  मार्गदर्शन लाभले. (Vivekananda College)

Related posts

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार