राष्ट्रवादीचे प्रवक्ते विलास लवांडेंना अटक, संग्राम भंडारे मोकाट

Vilas Lavande Arrest

पुणे : प्रतिनिधी : वारकरी संप्रदायात घुसखोर घुसले आहेत, असा आरोप करुन घुसखोर वारकऱ्यांची नावे जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे विकास लवांडे यांच्या वक्तव्याबद्दल निषेध व्यक्त करत त्यांच्या अंगावर शाई फेकणारा संग्राम भंडारे मोकाट असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

‘माझ्यावर जीवघेणारा हल्ला करणारा गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट आहेत. पण एका खोट्या फिर्यादीवरुन कसलाही पुरावा नसताना अटक करण्यात आली आहे’ असा आरोप विकास लवांडे यांनी केला. लवांडे यांना अटक झाल्याची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी वाघोली पोलिस ठाण्यात त्यांची भेट घेतली. (Vilas Lavande Arrest)

वारकरी संप्रदायात घुसखोर असल्याचा आरोप करत काही जणांची यादी जाहीर केल्यानंतर वाघोली पोलिस ठाण्यात लवांडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. लवांडेंना अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० मे पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. लवांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर तपासादरम्यान लवांडेंनी अटकपूर्व जामिनच्या अर्जात स्वत:विरोधात पूर्वी दाखल झालेल्या चार गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयात आक्षेप घेत लवांडेचे सरंक्षण रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरत लवांडेचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी लवांडेंना आज अटक केली. (Vilas Lavande Arrest)

पोलीस लवांडेंना अटक करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी ‘एक्स’ अकाउंटवर एक ट्विट केले आहे. त्यावर लवांडेंनी म्हटलं आहे की, “पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी.. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय? असा माझा सवाल आहे? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन, वकील, दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे.” (Vilas Lavande Arrest)

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर.के. कामत यांची निवड

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

तामिळनाडू, कर्नाटकात चार महिन्यात दोन लाख नागरिकांना कुत्र्यांचा चावा