Vantara cooperate : महादेवी हत्तीण परत देण्यासाठी वनताराचे सहकार्याचे आश्वासन

Vantara cooperate

मुंबई : प्रतिनिधी : महादेवी हत्तीण कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाकडे परत देण्यासाठी वनताराने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबईत आज बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा केली. (Vantara cooperate)

महादेवी हत्तीणीसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला उप मुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आमदार उपस्थित होते. महादेवीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू असून त्यांचे नेतृत्व करणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांची भूमिकाही मुख्यमंत्र्यानी जाणून घेतली. नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करुन सर्वोच्च न्यायालयात हत्तिणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून राज्य सरकार पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. (Vantara cooperate)

त्यानंतर बुधवारी सकाळी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट केली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.

या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Vantara cooperate)

राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी मठामध्ये समन्वयासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून सर्वोच्च न्यायालयात लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करेल. न्यायालयाचा जो आदेश येईल, त्यानुसार पुढील पावले उचलली जाणार आहेत.

Related posts

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य